कंत्राट कोटीचे...सफाई करताहेत शिवसेनेच्या नगरसेविका !

मुंबई- आग्रा महामार्गालगत असलेल्या समांतर रस्ता (सर्व्हीस रोड)ची देखभाल व सफाईसाठी कोट्यावधींचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र कंत्राटदार कोण?, अधिकारी कोण? हेच कोणाला माहित नाही.
कंत्राट कोटीचे...सफाई करताहेत शिवसेनेच्या नगरसेविका !

सिडको : मुंबई- आग्रा महामार्गालगत असलेल्या समांतर रस्ता (सर्व्हीस रोड)ची देखभाल व सफाईसाठी कोट्यावधींचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र कंत्राटदार कोण?, अधिकारी कोण? हेच कोणाला माहित नाही. हा सावळा गोंधळ अनेक वर्षे सुरु असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना चुंभळे यांनी स्वखर्चाने या रस्त्याची सफाई हाती घेतली आहे. 

मुंबई- आग्रा समांतर लगतचा रहिवासी भाग हा जवळपास पाच किलोमीटरचा आहे. तो महापालिका किंवा बांधकाम विभागाअंतर्गत येत नाही. त्यामुळे नागरिकांना नेमकी तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न पडतो? सदर समांतर रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागांतर्गत येतो. परंतु या विभागाचा जनतेशी फारसा संपर्क येत नाही. तसेच त्यांचे कार्यालय कुठे आहे व तक्रार कोठे करावी, असा प्रश्न नागरिकांना पडतो. नेमक्या याच गोष्टीचा गैरफायदा घेत हा विभाग या समस्येकडे कानाडोळा करत असल्याचे निदर्शनास येते. समांतर रस्ता वरील विविध बाबी वर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित ठेकेदारास कोट्यवधी रुपयांचा वर्षभरासाठी ठेका मिळतो. परंतु ठेकेदार व अधिकारी यांचे साटेलोटे असल्याने ते देखील याकडे फारसे लक्ष देत नाही. असा अनुभव आत्तापर्यंत शहरवासीयांना आलेला आहे. गरवारे पॉइंट ते भुजबळ फार्म दरम्यान या समांतर रस्त्याचा समावेश होतो. त्याच्या सफाईचे कंत्राट कोट्यावधींचे आहे. मात्र सफाई कधीच होत नाही. त्यामुळे या प्रकाराला कंटाळलेल्या नागरिकांच्या तक्रारींमुळे स्थानिक नगरसेविका कल्पना चुंभळे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने तणनाशक फवारणी सुरु केली आहे. एकंदरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचा हा सावळा गोंधळ थांबणार कधी, असा प्रश्न केला जात आहे.  
...
गाजर गवत वाढल्याने साप, मुंगूस, उंदीर त्यांचा रोज उपद्रव होत आहे. आम्ही स्वखर्चाने गवतावर कीटकनाशकांची फवारणी करून नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करत असतो. याकडे संबंधित विभागाने त्वरित लक्ष न दिल्यास भविष्यात आंदोलन छेडण्यात येईल.

- कल्पना चुंभळे, स्थानिक नगरसेविका

रहिवासी भागातील समांतर रस्त्यावर विविध समस्या उद्‌भवल्या असल्याचे लक्षात आले आहे. तरी त्यावर त्वरित कार्यवाही करण्यात येईल.
- भाऊसाहेब साळुंखे, अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com