पुढचे ३ दिवस नागरिकांची परिक्षा, अन्यथा पुन्हा लॉकडाउनचे संकेत

पॉझिटिव्‍हिटी रेट घटल्‍याने जिल्‍ह्यात निर्बंध शिथिल केल्यावर, पहिल्‍याच दिवशी मंगळवारी मोठी गर्दी झाली. त्‍यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. गर्दीच्‍या पार्श्वभूमीवर या शुक्रवार पर्यंत ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका जिल्‍हाधिकारी मांढरे यांनी घेतली आहे.
Suraj Mandhare
Suraj Mandhare

नाशिक : पॉझिटिव्‍हिटी रेट घटल्‍याने (Covid19 Positivity rate get Down) जिल्‍ह्यात निर्बंध शिथिल केल्यावर, (Unlockdown process begin in nashik) पहिल्‍याच दिवशी मंगळवारी मोठी गर्दी झाली. त्‍यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. गर्दीच्‍या पार्श्वभूमीवर या शुक्रवार पर्यंत ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांनी घेतली आहे.

नियमांचे पालन होत नसेल, तर जिल्‍ह्यात पुन्‍हा लॉकडाउन लावत कठोर निर्बंध लागू केले जातील, असे जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्‍पष्ट केले.

गेल्‍या दीड महिन्‍यापासून जिल्‍ह्यात निर्बंध लागू असल्‍याने अत्‍यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्‍तू सेवा मर्यादित वेळेसाठी उपलब्‍ध होत होत्‍या. रेड झोनमधून नाशिक बाहेर आल्‍याने मंगळवार (ता. १)पासून निर्बंध शिथिल करत सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी दिली. मात्र, पहिल्‍याच दिवशी तुडुंब गर्दी झाल्‍याने जिल्‍हाधिकारी मांढरे यांनी चिंता व्‍यक्‍त केली.

गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. असे झाल्‍यास जिल्‍ह्याचा पॉझिटिव्‍हिटी दर १० टक्क्‍यांपेक्षा अधिक जाण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. असे झाल्‍यास पुन्‍हा जिल्‍ह्यात कठोर निर्बंध लागू करावे लागतील. या संदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही जिल्‍हा प्रशासनास आदेश दिले होते.

पहिल्‍याच दिवशी झालेल्‍या गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणेची डोकेदुखी वाढण्याची शक्‍यता आहे. गर्दीची स्‍थिती पाहता येत्‍या दोन-चार दिवसांत नागरिकांनी नियमांचे पालन न केल्‍यास पुन्‍हा निर्बंध कठोर केले जातील, असे संकेत जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.
...

निर्बंध शिथिल करताच पहिल्‍याच दिवशी नागरिकांचा प्रतिसाद बघता, शुक्रवारपर्यंतच अनलॉक सुरू राहील असे वाटते. सद्यःस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोनशेने वाढली, तरी पॉझिटिव्‍हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा अधिक होईल. त्यामुळे नाशिककरांनी नियम पालन करत सहकार्य करावे.
-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com