प्रदर्शनाचे डोम झाले कोविड सेंटर, येथील सुविधा पाहून तोंडात बोट घालाल !

एरव्ही प्रदर्शन, समारंभासाठी असलेल्या ठक्कर डोम येथे अत्याधुनिक सुविधांचे कोविड-१९ सेंटर उभे राहिले आहे. `क्रेडाई`च्या सहकार्याने उभे राहिलेल्या या ३५० बेडच्या केंद्रातील सुविधा, सजावट आणि वातावरण पाहिले तर तोंडात बोट घालावे लागते.
प्रदर्शनाचे डोम झाले कोविड सेंटर, येथील सुविधा पाहून तोंडात बोट घालाल !

नाशिक : एरव्ही प्रदर्शन, समारंभासाठी असलेल्या ठक्कर डोम येथे अत्याधुनिक सुविधांचे कोविड-१९ सेंटर उभे राहिले आहे. `क्रेडाई`च्या सहकार्याने उभे राहिलेल्या या ३५० बेडच्या केंद्रातील सुविधा, सजावट आणि वातावरण पाहिले तर तोंडात बोट घालावे लागते. कदाचीत निरोगी व्यक्तीही म्हणेल, मला एक दिवस इथे राहिलेच पाहिजे, असे हे सेटर बनले आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी त्याचे लोकार्पण केले. रूग्णांची वाढती संख्या बघता मुंबई, पुण्यासारखी नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी, यासाठी या कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. क्रेडाईने तयार केलेलं हे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सेवेचे एक आदर्श मॉडेल असल्याचे मत श्री भुजबळ यांनी व्यक्त केले. 

श्री. भुजबळ या प्रसंगी म्हणाले, रुग्णांची संख्या कमी कशी होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तपासणी अधिक होत असल्याने रुग्णांचा आकडा वाढतो आहे. परंतु कोरोनाचा प्रसार अधिक वाढू नये यासाठी तपासणी अधिक वाढवून रुग्णांचा शोध घेण्याचे काम सुरूच ठेवावे. कोरोना हे युद्ध असून सर्वांना एकत्र येऊन त्यासाठी लढण्याची आवश्यकता आहे. कोरोना होणारच  नाही, याची काळजी सर्वांना घ्यावी, घाबरून जाऊ नये. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास अजून नवीन ठिकाणी जागा बघून प्राथमिक सुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात जेणेकरून तेथेही आवश्यकता पडल्यास तातडीने कोविड केअर सेंटर उभारता येणे शक्य होईल. सामाजिक बांधिलकी ठेऊन सर्व संस्था संघटना काम करतआहेत, समाजिक दायित्व  म्हणून हे काम सदैव कायम ठेवावे. 

असे आहे कोविड सेंटर...
अतिशय प्रशस्त, मोकळी हवा, शांत परिसर, उत्तम वातावरण, विरंगुळ्यासाठी कॅरमसह विविध इडोअर गेम, रुग्णालयाची जाणीव होऊ नये यासाठी अतिशय सुंदर रंगसजावटीच्या भिंती व त्यावर उत्तम चित्र काढण्यात आली आहे. पाण्यापासून स्वच्चतागृहापर्यंतच्या सर्व सुविधा येथे आहेत. अर्थात रुग्णांनीही त्या आपल्या आहेत, असे समजून त्याचा वापर केला, शीस्त व स्वच्छतेची जाणीव ठेवली तर ते पुढच्या रुग्णांनाही उत्तम स्थितीत उपलब्ध राहील. कोविड केअर सेंटर बनविण्यासाठी चित्रकार तसेच परिश्रम घेतलेल्या सर्वांचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. रिक्रियेशन कक्षाच्या माध्यमातून विविध खेळ, पुस्तके , टीव्ही यासह मनोरंजनाची तसेच रुग्णांना योगा, मेडिटेशनसाठी व्यवस्था करण्यात आल्याने अतिशय उत्तम स्वरूपाचे कोविड केअर सेंटर निर्माण झाले आहे. हॉस्पिटलमधील बेड्स संपतील तेव्हा या कोविड केअर सेंटरचा वापर करण्यात येईल. बेडची संख्या कमी पडू नये यासाठी अतिरिक्त बेड्स साठी ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली गेली आहे.

यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, स्थायी समिती सभापती गणेश गीते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी खासदार समीर भुजबळ, नगरसेवक विलास शिंदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, नोडल ऑफिसर डॉ. आवेश पलोड,निमाचे शशिकांत जाधव,रंजन ठाकरे, गिरीश पालवे, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, जीतुभाई ठक्कर,सुरेश पाटील,सुनील कोतवाल, कुणाल पाटील, गौरव ठक्कर, अनिल आहेर, सचिन बागड, अतुल शिंदे, हंसराज देशमुख, अंजन भालोडिया, नरेंद्र कुलकर्णी,हितेश पोतदार, डॉ.कैलास कमोद आदी उपस्थित होते.
...

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=oEJfDyarqkIAX-11GCo&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=39183dc145d7046ba7fd1322bec87f78&oe=5F549327

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com