नाशिक : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त कैलास जाधव यांनी आज मावळते आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडून कार्यभार स्विकारला. स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकने घेतलेली आघाडी कायम ठेऊ. नाशिक शहर कोरोनामुक्त करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मावळते आयुक्त गमे यांनी, शहरासाठी मुकणे धरण थेट पाईपलाईन योजना, गंगापूर `एसटीपी` योजना मार्गी लावल्याचे समाधान असल्याचे श्री. गमे यांनी सांगितले.
महापालिकेचे आयुक्त गमे यांची बुधवारी नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली झाली. त्यांच्या पदावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार श्री. जाधव यांनी आज महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे पदाचा कार्यभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर आयुक्त जाधव यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर कोरोनामुक्त करण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. प्रारंभी प्रोटोकॉल नुसार प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील व अतिरिक्त आयुक्त प्रविण अष्टेकर यांनी श्री. जाधव यांचे पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वागत केले. पदभार स्विकारल्यानंतर आयुक्त जाधव यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेऊन आज दुपारी कामकाजाला सुरुवात केली. विभागनिहाय माहिती घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
...
नाशिक कर्मभूमी : जाधव
यापुर्वी निफाड प्रांत व निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नाशिकमध्ये काम केले आहे. त्यामुळे नाशिक शहरातील महत्वाच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाशी लढताना दुसरीकडे नगरसेवकांना सोबत घेऊन समन्वयातून महापालिकेचे कामकाज करेन. मुंबई, पुणे नंतर नाशिक शहर वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे नियोजनबध्द पध्दतीने शहराचा विकास करणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्वांना सोबत घेवून काम करणार आहे.
...
https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

