नेत्यांना कोरोना प्रसन्न; जिल्हा बॅंकेला तिसरी मुदतवाढ! 

कोरोनाचा संसर्ग अनेकांना त्रस्त करीत आहे. ज्यांना ज्यांना कोरोनाने ग्रासले त्यातील अनेकांच्या जीवावर बेतले. नाशिकच्या आमदार, खासदार अन्‌ नेत्यांना विशेषतः जिल्हा बॅंकेच्या संचालकांना मात्र कोरोना प्रसन्न झाला आहे.
नेत्यांना कोरोना प्रसन्न; जिल्हा बॅंकेला तिसरी मुदतवाढ! 

नाशिक : कोरोनाचा संसर्ग अनेकांना त्रस्त करीत आहे. ज्यांना ज्यांना कोरोनाने ग्रासले त्यातील अनेकांच्या जीवावर बेतले. नाशिकच्या आमदार, खासदार अन्‌ नेत्यांना विशेषतः जिल्हा बॅंकेच्या संचालकांना मात्र कोरोना प्रसन्न झाला आहे. कोरोनामुळे येथील महत्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणूकांना तिसऱ्यांदा स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षाचे आमदार, खासदार प्रबळ नेते संचालक असलेल्या जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या सत्तेला त्याचा फायदा झाला आहे. 

नाशिक जिल्हा बॅंकेची निवडणूक या वर्षाच्या प्रारंभीच अपेक्षीत होती. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी देखील केली होती. प्रस्थापित व इच्छुक असे सर्वच नेत निवडणुकीच्या तयारीला लागले होते. गावोगावच्या सभासद संस्था व नेत्यांच्या मतदानाचे ठराव संकलीत करण्याचे काम देखील सुरु झाले होते. मात्र मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. त्यामुळे राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती दिली. यानंतर कोरोनाचा संसर्ग थांबला नाही. आणिबाणीची स्थिती कायम राहिली. त्यामुळे निवडणुकंची स्थगिती कायम राहिली. आता 28 ऑगष्टपर्यंत स्थगिती होती. सहकार विभागाने नवे परिपत्रक काढून त्याला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. नव्या परिपत्रकानुसार डिसेंबर पर्यंत निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाला तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेचे संचालक आनंदीत आहे. 

जिल्हा बॅंकेची सध्याची स्थिती अतिशय बिकट आहे. विशेषतः आर्थिक समस्यांमुळे बॅंक पुर्वीसारखी सत्तेचा प्रसाद देणारी राहिलेली नाही. परंतु जिल्ह्याच्या राजकारणाशी संपर्क व प्रभाव टिकवून ठेवण्याचे माध्यम म्हणून शेती व ग्रामीण अर्थकारणामुळे विविध सत्तेची सुत्रे जिल्हा बॅंकेच्या माध्यमातूनच हलविली जातात. भारतीय जनता पक्षाच्या आमदार सीमा हिरे, जिल्हा अध्यक्ष केदा आहेर, माजी खासदार हिरश्‍चंद्र चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, कॉंग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल, शिवसेनेचे आमदार सुहास कांदे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे असे विविध आमदार, खासदार बॅंकेचे संचालक आहेत. या सगळ्यांचीच कोरोनाचा संसर्ग सुरु असताना निवडणुकीची दगदग व धावपळीतून सुटका झाली आहे. आणखी काही महिने जिल्हा बॅंकेच्या सत्तेला मुदतवाढ मिळाली आहे. 

...असाही कोरोना प्रसन्न! 
विशेष म्हणजे सध्याचे संचालक शासनाने बरखास्त केले आहे. बॅंकेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र प्रशासक नियुक्तीच्या निर्णयाला उच्च न्यायालयात स्थगितू मिळवून जिल्हा बॅंकेचे सध्याचे संचालक मंडळात सत्तेत आहे. त्यामुळे एका अर्थाने हे न्यायालयाच्या स्थगितीने त्यानंतर कोरोनांमुळे न्यायालयासह शासकीय काम प्रभावित झाल्याने टिकून आहे. अनेकांना कोरोनाचा संसर्ग हैरान करतो. प्रकृतीला मारक ठरतो. आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणतो. नाशिकच्या जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाला मात्र तो लाभदायी ठरला. त्यामुळे एक प्रकारे या सर्वांच्या मनात कोरोना प्रसन्न असा विचार येत असावा. 
... 
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=A4nhKJTjBGEAX_puSZD&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=6e42bbfbc5916b23897bfda50384f383&oe=5F97CFA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com