छगन भुजबळांचा पाठपुरावा यशस्वी...शेतीला २,२७१ कोटींचे कर्ज

पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांनी पीक कर्ज वितरणासाठी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यासंदर्भात बॅंकांना धारेवर धरल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रतिकुल स्थिती असुनही खरीप हंगामात जिल्ह्यात दोन हजार २७१ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
छगन भुजबळांचा पाठपुरावा यशस्वी...शेतीला २,२७१ कोटींचे कर्ज

नाशिक : पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांनी पीक कर्ज वितरणासाठी केलेला पाठपुरावा यशस्वी झाला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यासंदर्भात बॅंकांना धारेवर धरल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रतिकुल स्थिती असुनही खरीप हंगामात जिल्ह्यात दोन हजार २७१ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. 

पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांनी पीक कर्ज वितरणासाठी सतत पाठपुरावा केला. पालकमंत्र्यांकडून प्रत्येक बैठकीत खरीप कर्ज वितरणावर भर देण्याच्या सुचना दिल्या जात होता. जिल्हाधिकारी यासंदर्भात अत्यंत सक्रीय होते. विशेष म्हणजे कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यात अतिशय धावपळीची स्थिती असतानाही जिल्हाधिकारी मांढरे यांनी याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. 

गत वर्षीच्या तुलनेत ६५८ कोटी रुपये अधिक पीककर्ज वाटण्यात आले. कोरोनामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना या कर्जपुरवठ्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुढाकार घेऊन तब्बल दीड महिन्यापासून विविध प्रयत्न केल्याने यंदा अनेक वर्षांनंतर प्रथमच दोन हजार २७१ कोटी रुपयांचा टप्पा पार झाला आहे. यासाठी प्रत्येक आठवड्याला आढावा घेतला.जात होता. अशा स्थितीत काही खासगी बँकांनी दुर्लक्ष केल्याचे लक्षात आल्यानंतर थेट बँकांच्या वरिष्ठांशी पत्रव्यवहार करण्यात आला. स्थानिकांच्या कामकाजात सुधारणा करण्याचे सुचविले. जिल्हा बँकेला वेळोवेळी पत्रव्यवहार करीत, उद्दिष्टवाढीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या व्यवस्थापकांशी नियमित बैठका घेत आव्हानात्मक परिस्थितीत खरीप पीक कर्जाचे वितरण झाले. 

आढावा घेतला. जिल्हाधिकारी स्वतः दर आठवड्याला बैठक घेत असल्याने या संपूर्ण कामात सातत्य राहिले. जिल्हा बँकेने आपले उद्दिष्टापेक्षाही जास्त कर्ज वितरण केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, यूबीआय बँकांनी खूप लक्ष केंद्रित केले होते. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये सुरवातीला खूप मागे असलेल्या जिल्हा बँकेने २२१ कोटींपर्यंत मजल मारली. 

खरीप पीक कर्ज वितरणाचे गेल्या वर्षी तीन हजार १४७ कोटी उद्दिष्ट होते आणि कर्ज वाटप एक हजार ६२३ कोटी इतके झाले होते. या वर्षी ती हजार ३०० एवढे उद्दिष्ट असून, कर्ज वितरण दोन हजार २७१ कोटी इतके झाले आहे. वाढीव उद्दिष्ट असून व परिस्थिती प्रतिकूल असूनही गेल्या वर्षीपेक्षा १७ टक्के अधिक कर्ज वितरण झाले आहे. या कर्ज वितरणात एनडीसीसी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने चांगल्या प्रकारे कर्ज वितरण केले आहे. तर एनडीसीसी, बँक ऑफ इंडिया व युनाटेड बँक ऑफ इंडियाने आपल्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर्ज वितरण केले आहे. 

जिल्हा बॅंकेचे ४४३ कोटी कर्ज 
कृषी पीककर्ज वाटपात जिल्हा बॅंकेचा पुढाकार असतो. त्यांचे कर्जवितरण सर्वाधीक असते. मात्र सध्या बॅंक आर्थिक अडचणीत असल्याने गतवर्षी व यंदा खरीप पीकर्ज वितरणाबाबत अनिश्चितता होती. मात्र महात्मा फुले कर्ज माफी योजनेचे 910 कोटी रुपये राज्य शासनाकडून मिळाले. त्यामुळे पीककर्ज वितरणाचा मार्ग मोकळा झाला. यामध्ये कंसात उद्दीष्ट, जिल्हा बॅंक  ४४३ (४३७) कोटी, महाराष्ट्र बँक  ३८७ (५१०),  स्टेट बँक  ३७३ (४८६), बँक ऑफ इंडिया  १०३ (११५) आणि युनियन बँक १३९ (१५५). 
...
खरिपाप्रमाणेच रब्बी पीक कर्ज वितरणाची रचना करण्यात येणार आहे. खरिपाच्या अनुषंगाने कर्ज वितरणाची रचना तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रब्बीच्या हंगामातही कर्ज वितरण चांगले राहील. राज्यातही पहिल्या चार-पाच जिल्ह्यांत नाशिकचा समावेश आहे. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी. 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=A4nhKJTjBGEAX_puSZD&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=ca228b0220f44913c42c42037cf8fcff&oe=5F9BC427

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com