NDCC Bank President KEDA AHER Found COVID-19 POSITIVE | Sarkarnama

जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर कोरोना पॉझिटिव्ह 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

जिल्हा बँकेचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. कुठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांना तशी कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी गुरुवारी तपासणी केली असता शुक्रवारी हा अहवाल पॉझिटिव्ह आला.

नाशिक :  जिल्हा बँकेचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. नियमीत कामकाज करतांना यादरम्यान कुठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांना तशी कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी गुरुवारी तपासणी केली असता शुक्रवारी हा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनी लगेचच स्वतःचे विलगीकरण करून घेतले आहे. 

यापूर्वी आमदार सरोज अहिरे, आमदार नरेंद्र दराडे  तसचे चांदवड- देवळा मतदारसंघाचे आमदार डॅा राहूल आहेर हे देखील कोरोना पॅाझिटिव्ह आढळले होते. त्यांनी विलगीकरण तसेच उपचार सुरु ठेवले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. विशेषतः ग्रामीण भागात त्याचा प्रसार वाढत आङे. श्री. आहेर यांनी सोशल मीडियावर संदेश पोस्ट करुन संपर्कात आलेल्यांनी आपली काळजी घ्यावी, तसेच काही त्रास होत असल्यास भीती न बाळगता डॉक्टरांकडून आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले. 

देवळा शहरासह तालुक्यातील गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने गुरुवारी आणि शुक्रवारी मिळून ४८ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या दीडशेवर जाऊन पोचली आहे. ग्रामीण भागातही कोरोना हातपाय पसरवू लागल्याने येथील चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी आलेल्या ७७ अहवालांमध्ये २४ अहवाल पॉझिटिव्ह, तर शुक्रवारी पुन्हा ९२ अहवालांमध्ये २४ पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांची संख्या १५३ इतकी झाली आहे. यात देवळा १३, उमराणा ११, वाखारी चार, विठेवाडी पाच तसेच गुंजाळनगर, कापशी, मटाणे, लोहोणेर येथील प्रत्येकी दोन, तर वाजगाव, माळवाडी, सुभाषनगर, खुंटेवाडी, फुलेमाळवाडी, सरस्वतीवाडी, भिलवाड या गावांतील प्रत्येकी एक अशा एकूण ४८ रुग्णांचा समावेश असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली.  
..
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख