यामुळे वैंकय्या नायडूंना "जय शिवाजी' घोषणेचे एक लाख पोस्ट कार्ड पाठवणार ! - NCP Youth Wing start initiative of 1 lac post card to Vainkaiyya Naidu | Politics Marathi News - Sarkarnama

यामुळे वैंकय्या नायडूंना "जय शिवाजी' घोषणेचे एक लाख पोस्ट कार्ड पाठवणार !

संपत देवगिरे
गुरुवार, 23 जुलै 2020

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील नागरीकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे एक लाख निषेधाची पोस्ट कार्ड पाठविली जाणार आहेत. त्याचा प्रारंभ आज नाशिकच्या मुख्य टपाल कार्यालयातून करण्यात आला. 

नाशिक : बुधवारी राज्यसभेच्या सदस्यांच्या शपधविधीच्या कार्यक्रमात उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अयोग्य शब्दप्रयोग केला. त्यांना या घोषणेचे वावडे आहे का?. त्याच्या निषेधार्थ उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे एक लाख निषेधाची पोस्ट कार्ड पाठविली जाणार आहेत. त्याचा प्रारंभ आज नाशिकच्या मुख्य टपाल कार्यालयातून करण्यात आला.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम केला जाणार आहे. उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी अयोग्य शब्दप्रयोग केला. कोणतिही राजकीय विचारसरणी असली तरीही सर्वांनाच छत्रपती शिवाजी महाराज आदरस्थानीच आहेत. राज्यसभेत शपथविधी दरम्यान शपथ घेताना समारोपाला "जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा दिली होती. त्याला नायडू यांनी विरोध केला. त्यामुळे त्याच आशयाचे पत्र पाठविण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी जाहिर केले आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातून एक लाख पत्र उपराष्ट्रपतींना पाठविण्याची सुरुवात मुख्य पोस्ट ऑफिस येथून झाली. त्यासाठी विशेष टपाल कार्ड छपाई करुन घेण्यात आले आहेत. त्यावर छत्रपती शिवाजी की जय अशा घोषणा आहेत. 

जय शिवाजी घोषणा हवीच!
"या देशाचा लोकशाहीचा पाया हाच छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यकारभाराचा आदर्श होता असे गौरवोद्गार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. "देशाचे पंतप्रधानसुद्धा छत्रपती शिवरायाच्या चरणी आपली निष्ठा दाखवितात. जिथे या देशाचे पंतप्रधान स्वतःला जनतेचा सेवक आणि देशाचे चौकीदार समजतात. तिथ हे उपराष्ट्रपती व्यंकया नायडू संसदेला स्वतःची खाजगी मालमत्ता समजतात का?. यापूर्वी शपथ घेतांना "जय श्रीराम', "जय ममता' यांसह विविध घोषणा दिल्या आहेत. "छत्रपतींविषयी देशभरात आदर आहे. जय भवानी जय शिवाजी या घोषणेला आक्षेप कसे घेऊ शकतात?.त्यामुळेच जाहीर निषेध म्हणून "जय भवानी, जय शिवाजी' या आशयाचे पत्र उपराष्ट्रपतींना पाठविणार आहे, असे श्री कडलग म्हणाले.

 यावेळी तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, भुषण शिंदे, जयराम शिंदे, अक्षय कहांडळ, संदीप भेरे, किरण भुसारे, प्रफुल्ल पवार, धिरज बच्छाव, बबलू पाटील, प्रशांत लाभडे, विशाल गायधनी, महेश शेळके, लखन बेंडकुळे, समाधान पवार आदी उपस्थित होते. 
... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख