"राष्ट्रवादी'चा आरोप, सत्ताधाऱ्यांना शहरातील खड्डयांचा विसर ! 

शहरातील विविध भागात खड्डे पडले आहेत. सध्या महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना विस्मरणाचा आजार जडला आहे. त्यांच्या डोक्‍यात प्रकाश पडून त्यांना खड्ड्यांची आठवण व्हावी, याकरिता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे खड्ड्यांमध्ये दिवे लावून आंदोलन करण्यात आले.
"राष्ट्रवादी'चा आरोप, सत्ताधाऱ्यांना शहरातील खड्डयांचा विसर ! 

नाशिक : शहरातील विविध भागात खड्डे पडले आहेत. सध्या महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांना विस्मरणाचा आजार जडला आहे. त्यांच्या डोक्‍यात प्रकाश पडून त्यांना खड्ड्यांची आठवण व्हावी, याकरिता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे खड्ड्यांमध्ये दिवे लावून आंदोलन करण्यात आले अशी माहिती शहराध्यक्ष अंबादास खैरे यांना दिली. 

ते म्हणाले,  शहराच्या सर्व भागात रस्त्यांवर खड्डे झाले आहेत. सत्ताधारी नेत्यांनी हे खड्डे बुजविण्याएैवजी भ्रष्टाचार करुन खीसे भरले. त्यामुळे शहरातील खड्डे तातडीने बुजवावेत अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल.  

यासंदर्भात शहराध्यक्ष अंबादास खैरे म्हणाले, शहरात पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामांमध्ये रस्त्यांची कामे केल्याचा दावा महापालिकेने केला होता. त्यानंतर या रस्त्यांवर मोठे खड्डे झाले आहेत. शहराच्या सर्व भागात नाशिककरांना हेच खड्डे झालेले रस्ते दिसत आहेत. शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचा अनुभव वाहनधारकांना येत आहे. तीन ते चार वर्षापासून शहरातील खड्डे जसेच्या तसे आहेत. या खड्ड्यांवर तात्पुरती मलमपट्टी करण्यात येऊन कोट्यावधीचा भ्रष्टाचार रस्ते दुरुस्ती मध्ये होत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच कॉलनी अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना कंबरदुखी व अंगदुखीचा त्रास होत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे वारंवार अपघात होत आहेत. यावर सर्व स्तरातून विरोध होत आहे. तरीही महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी यासंदर्भात काहीही केलेले नाही. उलट नाशिक महापालिकेच्या बांधकाम विभागाने नऊ हजार खड्डे बुजविण्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात रस्त्यावर खड्डे जशाच्या तसे दिसत आहे. काही रस्त्यांवरील खड्डे मुरूम व माती टाकून तात्पुरते बुजविण्यात आल्याने पावसामुळे मुरूम माती वाहून गेली आहे. त्यामुळे तात्पुरते बुजविलेले खड्डे परत दिसू लागले आहे. महारपालिकेतील गुणवत्ता विभागासह बांधकाम विभागात रस्त्यांच्या डागडुजीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत महापालिकेतील सत्ताधिकाऱ्यांना विस्मरणाचा आजार जडला आहे. त्यांच्या डोक्‍यात प्रकाश पडावा आणि खड्ड्यांची आठवण व्हावी, याकरिता शहरातील रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये दिवे लावून आंदोलन करण्यात आले. 

यावेळी कृष्णाजी काळे, निलेश सानप, बादल कर्डक, डॉ. संदीप चव्हाण, हर्षल चव्हाण, जय कोतवाल, सागर बेदरकर, मुकेश शेवाळे, निलेश भंदुरे, राहुल कमानकर, अक्षय पाटील, संतोष भुजबळ, अमोल सूर्यवंशी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  
...
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=L7Bqo_Br3akAX9SkCWm&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=728c2ec1929f72bdfd07eccae4909877&oe=5F97CFA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com