मराठा आरक्षणासाठी `राष्ट्रवादी` पंतप्रधानांना हजार पत्रे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त तालुका व शहर ‘युवा जोडो व संपर्क अभियान’ आढावा बैठक जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
NCP letters
NCP letters

रावेर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन (NCP 22nd Anniversary) दिनानिमित्त तालुका व शहर ‘युवा जोडो व संपर्क अभियान’ (Connect youth drive) आढावा बैठक जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

युवक शाखेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन पाटील व रावेर शहराध्यक्ष प्रणित महाजन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन येथील बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात केले होते. या वेळी ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही विनंती’ या आशयाची १ हजार पत्रे राष्ट्रवादी युवक काँग्रेस रावेरच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला पाठविण्यात आली.

माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, सावदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. पवन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तथा पंचायत समितीचे सदस्य योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ॲड. खडसे यांनी अध्यक्षीय विचार मांडले. रमेश पाटील, राजेश वानखेडे, रवींद्र पाटील या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तर दीपक पाटील यांनी प्रास्ताविक केले. गोपाळ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस रावेर तालुका उपाध्यक्ष शुभम पाटील, तालुका उपाध्यक्ष विक्की महाजन सरपंच अमोल पाटील उपस्थित होते.

...
..
ङेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com