इंधन दरवाढीने त्रस्त नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन `राष्ट्रवादी`ची गांधीगिरी

केंद्र शासनाच्या इंधन दरवाढीने सामान्यांना पेट्रोल- डिझेल खरेदी करणे अशक्य झाले आहे. अशा स्थितीत पेट्रोल भरणारे नागरिक, ग्राहकांना पेट्रोल पंपावर जाऊन राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलाबाची फुले देत वेगळे आंदोलन केले.
इंधन दरवाढीने त्रस्त नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन `राष्ट्रवादी`ची गांधीगिरी

नाशिक : केंद्र शासनाच्या इंधन दरवाढीने सामान्यांना पेट्रोल- डिझेल खरेदी करणे अशक्य झाले आहे. अशा स्थितीत पेट्रोल भरणारे नागरिक, ग्राहकांना पेट्रोल पंपावर जाऊन राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलाबाची फुले देत वेगळे आंदोलन केले. दिवसभर पेट्रोल भरणारांना गांधीगिरी करीत फुले देण्याचे आंदोलन चर्चेचा विषय ठरले.

यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी एकही भुल कमल का फुल; पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या अशा घोषणा देत पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फुल देऊन केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या दरवाढीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल दर कमी करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करावे. पेट्रोल व डिझेलची मोठया प्रमाणात दरवाढ झाल्याने अजून महागाईचा भडका उडण्याची भीती देखील यावेळी व्यक्त करण्यात आली.

केंद्रातील भाजप सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणेघेणे नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पगार यांनी यावेळी बोलतांना केली.

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ त्र्यंबक नाका येथील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. अच्छे दिनच्या घोषणेला भुलून निवडून दिलेल्या केंद्रातील भाजप सरकारने नियमितपणे केलेल्या दरवाढीबद्दल पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना “गुलाब पुष्प” देऊन  गांधीगिरी आंदोलन केले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार कदम, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, जिल्हा पदाधिकारी सर्वश्री विलास सानप, संदीप अहिरे, भुषण शिंदे, गणेश गायधनी, तौसीफ मणियार आदी मास्क घालून व सोशल डीस्टन्सिंगचे नियम पाळून सहभागी झाले.  

त्या काकू कुठे गेल्या ?
लोकसभा निवडणुकीपूर्वी 2014 मध्ये वाहिन्यांवर येऊन “बोहत हो गयी मेहंगाई कि मार...” अस म्हणणाऱ्या त्या काकू आता पेट्रोलचे दर ९० रुपये व डिझेलचे दर ८० रुपये लिटर झाले तरी दिसत नाहीत त्यामुळे त्या काकू कुठे गेल्या ? असा सवालही कार्यकर्ते, पदाधिका-यांनी केला.

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=uvwupo9gaLUAX9hge7O&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=163b13da4e265415a2a91c5417e4c416&oe=5F2128A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com