संजय राऊतांच्या बाणाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते घायाळ? - NCP Workers injurd by Sanjay Rauts Arrow. Shivsena Politics | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राऊतांच्या बाणाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते घायाळ?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

देवळाली विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. हा बलेकिल्ला यापुढेही शिवसेनेचाच राहील. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने कार्यरत व्हावे असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले.

नाशिक : देवळाली विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला होता. हा बलेकिल्ला यापुढेही शिवसेनेचाच राहील. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने कार्यरत व्हावे असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले. या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदार आहेत. त्यामुळे खासदार राऊत यांच्या शब्दबाणाने राष्ट्रवदी कॉंग्रेसच्या स्थानिक कार्यकर्ते, नेते चांगलेच घायाळ झाले.

श्री. राऊत यांनी पळसे येथे भेटे दिली. यावेळी त्यांनी विविध पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी माजी मंत्री व देवळाली मतदारसंघाचे दिर्घकाळ प्रतिनिधीत्व केलेले शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरोज अहिरे येथून विजयी झाल्या होत्या. तर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा या गावात पराभव झाला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रीत सत्तेत आहे. त्यात शिवसेना मोठा भाऊ आहे. या पार्श्‍वभूमीवर हे वक्तव्य सुचक मानले जाते. त्याचा हा शाब्दीक बाण खरे तर शिवसेनेच्या मरगळलेल्या कार्यकर्त्यांना सक्रीय करण्यासाठी होता. मात्र त्यांच्या या बाणाने घायाळ झाली ती राष्ट्रवदी कॉंग्रेस.

यावेळी खासदार राऊत म्हणाले, १९९० पासून गेले तीस वर्षे देवळाली मतदारसंघात शिवसेनेचा आणदार होता. सलग पाच वेळा शिवसेनेचे बबनराव घोलप येथे आमदार होता. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत योगेश घोलप आमदार हते. तीन वेळे येथे शिवसेनेचा खासदार विजयी झाला आहे. नाशिक महापालिकेत सत्ता, महापौर, भगूर नगरपालिकेसह विविध ग्रामपंचायतींत शिवसेनेला मतदारांनी सत्तेत बसवले. त्यामुळे शिवसेनेचा येथे सतत वरचष्मा आहेच. कोणीही ते नाकारु शकत नाही. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला धक्का बसला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी घेतली. मात्र यापुढेही शिवसेना कार्यकर्त्यांनी सक्रीय राहून जनतेशी संपर्क वाढवावा. जनता नक्कीच पुन्हा शिवसेनेच्या पारड्यात मतांचा कौल टाकील. भविष्यात देखील देवळाली हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहील यात माझ्या मनात शंका नाही.

खासदार राऊत यांच्या वक्तव्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचा हेतू होता तो यशस्वी झाला. कारण त्यांच्या या वक्तव्यामुळे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत वरचढ ठरलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना हे वक्तव्य चांगलेच बोचल्याच्या प्रतिक्रीया आल्याने राऊत यांचा हेतू यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख