फोन येताच राष्ट्रवादीकडून रुग्णालयातील कोरोनाग्रस्तांना पोहोचली मदत ! - NCP worker Rajaram Murkute helps covid 19 patients in sinner | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

फोन येताच राष्ट्रवादीकडून रुग्णालयातील कोरोनाग्रस्तांना पोहोचली मदत !

संपत देवगिरे
सोमवार, 6 जुलै 2020

सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील कोरोना रुग्णाला पाणीही उपलब्ध नव्हते. त्यांनी आज पहाटे गावातील राष्ट्रवादी कॅांग्रेसचे राजाराम मुरकुटे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी फक्त गावातील रुग्णाला नव्हे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वच रुग्णांना काही वेळातच सॅनीटायझर, पिण्याचे पाणी व अन्य साहित्य उपलब्ध केले. 

सिन्नर : येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णाला पाणीही उपलब्ध नव्हते. त्यांनी आज पहाटे गावातील राष्ट्रवादी कॅांग्रेसचे राजाराम मुरकुटे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी फक्त गावातील रुग्णाला नव्हे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्वच रुग्णांना काही वेळातच सॅनीटायझर, पिण्याचे पाणी व अन्य साहित्य उपलब्ध केले. त्यामुळे त्रस्त रुग्णांना दिलासा मिळाला. 

कोरोणाचा शिरकाव मनेगाव सारख्या लहान गावांतही झाला आहे. येथील काही रुग्ण सिन्नरच्या शासकीय रुग्णालयात दाखल आहेत. आज पहाटे एका कोरोनाबाधिताने सिन्नर ग्रामीण रुग्णालयातून श्री मुरकुटे यांच्यांशी संपर्क साधला. रुग्णालयात सॅनीटायझर, मिनरल वॅाटर मिळत नाही. कृपया त्याची व्यवस्था करावी. 

ही माहिती मिळाल्यावर श्री. मुरकुटे यांनी तातडीने आपल्या सहका-यांशी संपर्क केला. तातडीने ते रुग्णालयात गेले. त्यांनी महेश नाईक, दिलीप खेडलेकर, वैभव गायकवाड आदी सहकाऱ्यांशी बोलून त्यांनी साहित्य खरेदी केले. मदत मागणारी व्यक्ती मनेगावची होती. मात्र ही समस्या सबंध रुग्णालयाची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी रुग्णालयातील सर्व रुग्णांसाठी सॅनीटायझर व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. हे साहित्य त्यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ.  निर्मला ताई पवार यांच्याकडे सुपूर्द  केले.  या मदतीने त्यादेखील आवाक झाल्या. फोन केल्यावर काही वेळातच ही मदत पोहोचली होती.  त्यामुळे गरजू रुग्णाला देखील घरातील सदस्यांना फोन करुन मदत मागीतल्याचे समाधान मिळाले. यावेळी माजी नगरसेवक हर्षद देशमुख, माजी उपसरपंच सतीश पवार, दिलीप खेडलेकर, वैभव गायकवाड आदी उपस्थित होते.

नाशिक शहरातील कोरोनाचा प्रसार आता लगतचे तालुके व ग्रामीण भागात देखील होऊ लागला आहे. या रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते, मात्र त्यांना अनेकदा किमान सुविधाही दिल्या जात नाहीत. अनेकदा रुग्णालयातील रुग्णच नव्हे तर कर्मचारीही तक्रारी करतात. नाशिक शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयीतल दुरावस्थेविषयी तर तेथील क्वारंटाईन झालेल्या सहाय्यक जिल्हा चिकीत्सकांनवीच आपल्याला चहा देखील मिळत नाही अशी व्यथा मांडली होती. असाच अनुभव सर्व विलगीकरण कक्षांत येत आहेत. त्याचे असंख्य प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणांच्या सुविधा व कामकाजावर कोणीतरी लक्ष घालण्याची गरज असल्याचे पुढे आले आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी कॅांग्रेसचे कार्यकर्ते लक्ष घालणार आहेत. त्याबाबत कोणालाही मदतीची गरज पडल्यास मदत केली जाईल, असे राष्ट्रवादी युवक कॅाग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी सांगितले. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क करुन कोरोना रुग्णांच्या सुविधांसाठी प्रशासनाला सुचना कराव्यात याव्यात अशी विनंती त्यांनी केल्याचेही ते म्हणाले. 
...   
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख