गॅस दरवाढीविरोधाचा चुलीवर स्वयंपाक करुन निषेध - NCP Womens agitation for gas price hike, Nashi Politics | Politics Marathi News - Sarkarnama

गॅस दरवाढीविरोधाचा चुलीवर स्वयंपाक करुन निषेध

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

स्वयंपाकाचा गॅस आणि पेट्रोल- डिझेलच्या दरवाढी विरोधात शहरात  ठिकठिकाणी महिला व राजकीय पक्षांतर्फे आंदोलने होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुषमा पगारे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी शेणाच्या गोव-यांवर चुल पेटवून स्वयंपाक केला.

नाशिक : स्वयंपाकाचा गॅस आणि पेट्रोल- डिझेलच्या दरवाढी विरोधात शहरात  ठिकठिकाणी महिला व राजकीय पक्षांतर्फे आंदोलने होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुषमा पगारे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी शेणाच्या गोव-यांवर चुल पेटवून स्वयंपाक केला. या आंदोलनाची परिसरातील महिलांमध्ये चांगलीच चर्चा झाली. 

स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य गृहिणी त्रस्त आहेत. या दरवाढीने केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी  नाशि शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने `शेणाच्या गोव-यावर स्वयंपाक आंदोलन’ करण्यात आले. पक्षाच्या जिल्हा निरीक्षक प्रा. रंजना देशमुख, शहर कार्याध्यक्षा सौ.सुषमा पगारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवन येथे महिलांनी आंदोलन केले. 

यापूर्वीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने चूल पेटवा आंदोलन करून केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. मात्र सरकारकडून कोणत्याही आंदोलनाची दखल घेतली जात नाही. त्यामुळे महिला वर्गात नाराजी आहे. सरकारने या अत्यंत गंभीर सनस्येची दखल न घेतल्यास महिलांच्या भावनांचा उद्रेक होईल असा इशारा नगरसेविका पगारे यांनी यावेळी दिला. 

त्या म्हणाल्या, सर्वसामान्यांना महागाईने मोठा झटका दिलाय. घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी  सिलिंडरच्या किंमती जाहीर केल्या आहेत. त्यात प्रति सिलिंडर पंचवीस रुपयांनी दरवाढ झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरचे दर सहा रुपयांनी वाढवण्यात आलेयत. याआधी वाणिज्य वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलेंडरचे दर 190 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. शासन कशाच्या आधारावर ही दरवाढ करीत आहे हे अनाकलनीय आहे. प्रत्येक वस्तु महागल्याने सगळेच दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.  

यावेळी पश्चिम विधानसभा अध्यक्ष पुष्पा राठौड़, विधानसभा कार्याध्यक्षा आशा भंदुरे, प्रदेश सदस्य संगिता पाटिल, संगिता चौधरी, दिक्षा दोन्दे यांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख