नाशिक राष्ट्रवादीची ‘एक पत्र मराठा युवकांच्या भविष्यासाठी’ मोहीम - NCP will send 11k letters to PM for Maratha Reservation, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिक राष्ट्रवादीची ‘एक पत्र मराठा युवकांच्या भविष्यासाठी’ मोहीम

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बावीसावा वर्धापन दिन आज उत्साहात झाला. या निमित्ताने मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या मोहीमेचे घोषणा करण्यात आली. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अकरा हजार पत्र पाठविली जाणार आहेत.

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बावीसावा वर्धापन दिन (NCP celibrate 22 nd Foundation day) आज उत्साहात झाला. या निमित्ताने मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ (Youth wing will take drive for maratha reservation) या मोहीमेचे घोषणा करण्यात आली. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना अकरा हजार पत्र पाठविली जाणार आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. सर्व कार्यकर्ते पंतप्रधान मोदी यांना ११००० पत्रं पाठवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणार आहेत. या मोहिमेची सुरवात राष्ट्रवादी भवन येथे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली.

पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी युवक कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सुचनेनुसार मोहीम हाती घेतली आहे. मराठा समाजातील तरुणांच्या भविष्यासाठी समाजाला आरक्षण देऊन त्यांचे भविष्य उज्वल करावे. मराठा आरक्षणातील कायदेशीर पेच केंद्र सरकारच सोडवू शकणार आहे. मराठा आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादेची अट शिथिल करण्यासाठी संविधानात दुरुस्ती करायला हवी. त्यासाठी दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा. केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. 

पक्षाने आजपर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे. सर्वसमावेषक आणि सर्व समाजांच्या हितासाठी काम केले आहे. हाच धागा पकडत पक्षाचा विचार लक्षात घेऊन वर्धापन दिनानिमित्त ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ ही मोहीम विधानसभा व विभाग निहाय राबविली जात आहे. तीन विधानसभा व सहा विभागातील अध्यक्षांनी आपल्या भागातील नागरिकांना या मोहिमेत सहभागी करण्याचे आवाहन शहराध्यक्ष खैरे यांनी केले आहे. 

यावेळी विधानसभा अध्यक्ष जय कोतवाल, बाळा निगळ, विभाग अध्यक्ष संतोष जगताप, सागर बेदरकर, राहुल कमानकर, शहर पदाधिकारी नवराज रामराजे, संतोष भुजबळ, अक्षय पाटील, अविनाश मालुंजकर, अमोल सूर्यवंशी, जयेश बोरसे, मिलिंद सोळंकी, हर्षल चव्हाण आदी उपस्थित होते.
....
हेही वाचा...

वाघाशी मैत्री होत नसते, कोणाशी मैत्री करावी हे वाघ ठरवतो

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख