रोहिनी खडसेंचे राजकीय नुकसान व्याजासकट भरुन देऊ  - NCP Will rgain Rohini Khadse`s Political loss. Jayant Patil Politics | Politics Marathi News - Sarkarnama

रोहिनी खडसेंचे राजकीय नुकसान व्याजासकट भरुन देऊ 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

मागच्या निवडणुकीत रोहिनीताई खडसेंचा एक टक्का मतांनी पराभव झाला. आमच्यामुळे हे नुकसान झाले. हे जे एक टक्का मते कमी पडलीत, त्याबाबत मी मोठा भाऊ या नात्याने त्यांना वचन देतो की, पुढच्या वेळी तुम्ही या विभागातून उमेदवारी कराल तेव्हा पंधरा टक्के फरकाने तुम्ही विजयी व्हाल.

जळगाव : मागच्या निवडणुकीत रोहिनीताई खडसेंचा एक टक्का मतांनी पराभव झाला. आमच्यामुळे हे नुकसान झाले. हे जे एक टक्का मते कमी पडलीत, त्याबाबत मी मोठा भाऊ या नात्याने त्यांना वचन देतो की, पुढच्या वेळी तुम्ही या विभागातून उमेदवारी कराल तेव्हा पंधरा टक्के फरकाने तुम्ही विजयी व्हाल. तुम्ही निवडून आल्याशिवाय राहणार नाही. तुमचे जे नुकसान आम्ही मागच्या निवडणुकीत तुमचं केल, ते व्याजासकट भरुन देण्याचे काम आम्ही करु, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. 

जयंत पाटील यांचा जनसंवाद यात्रेद्वारे राज्यभर दौरा सुरु आहे. त्याअंतर्गत जळगाव येथे झालेल्या सभेत भाजपच्या विविध कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी मंत्री एकनाथ खडसे यांसह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. पाटील म्हणाले, आज आम्ही सगळे नाथाभाऊंच्या कर्मभूमीत आलो आहोत. गेल्या पाच सहा दिवसांत जीथे जाऊ तीथे नाथाभाऊ दौऱ्यात सहभागी झाले. ते बुलडाण्याला आले, तीथे लोकांनी त्यांच स्वागत लोकांनी केले. ज्या मतदारसंघात आम्ही निवडणुका लढवू शकलो नाही, तेथील कार्यकर्ते म्हणत होते, आता नाथाभाऊ आले आहे, आपली विधानसभा आली म्हणुन समजा. हे फक्त मुक्ताईनगरपर्यंतच मर्यादीत नाही. उत्तर महाराष्ट्रात, बुलडाण्यात आणि महाराष्ट्रात जीथे जीथे नाथाऊंनी काम केलं तेथे हा करंट जाणार आहे. त्याचा पक्षाला तेथे नक्की फायदा होईल. 

राष्ट्रवादी बुज राखनारा पक्ष
ते पुढे म्हणाले, अद्याप अनेकांच्या प्रवेशाची चर्चा सुरु आहे. अनेक नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यावर तांत्रीक विषयावर चर्चा होत आहे. पक्षांतरबंदी कायदा व अन्य अडचणींमुळे त्यांना येता येत नाही. ते शरीराने तिकडे आहेत, मात्र मनाने नाथाऊंची बाजू घेत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांची बुज राखणारा पक्ष आहे. आमचा पक्ष मर्यादीत असेल. कदाचीत बिहार, उत्तर प्रदेश व अन्य राज्यात आमची फार ताकद नसेल. मात्र आमच्या नेत्याकडून देशभरातील लोकांना अपेक्षा आहेत. आपले प्रश्‍न कोण सोडवणार आहे?. असा प्रश्‍न पडतो तेव्हा त्यांची अपेक्षा फक्त शरद पवार हेच असतात. 

केंद्र सरकार पुंजीपतींचे 
श्री. पाटील केंद्रातील सरकार पुंजीपतींचे हित बघते आहे असा आरोप केला. ते म्हणाले, आज केंद्रातील सरकार विरोधात शेतकरी भूमिका घेत आहेत. भविष्यात अडचणीचे ठरतील असे कायदे तयार केले आहे. आधारभूत किंमत नष्ट होईल. म्हणून कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांनी दिल्ली वेढा घातला आहे. 1771 साली अफगानीस्तानचा नजीब खान याने दिल्लीवर स्वारी केली. त्यात त्याने तेथील बादशहाला बाजुला करुन सत्ता हस्तगत केली. महादजी शिंदे यांनी मराठी सैन्यासह दिल्लीवर आक्रमन केले. तेव्हा नजीब खानने दिल्लीला कुंपन घातले होते. आज दिल्लीत काय सुरु आहे?. शेतकऱ्यांना घाबरुन केंद्र सरकारने दिल्लीच्या रस्त्यावर कुंपन घातले आहे. काटेरी तारांचा वेढा घातला आहे. तिसऱ्या अडथळ्यात अर्धा अर्धा फुटाचे खीळे कॉंक्रीटमध्ये लावण्यात आले आहे. यावरुन आपल्या देशाचा राजा घाबरलेला आहे हे स्पष्ट होते. भाजप पुंजीपतींचा पक्ष आहे. ही त्यांची प्रतिमा होती. 

कामगारांविरोधी सरकार
गोपिनाथराव मुंढे, एकनाथराव खडसे यांच्यामुळे त्यांना बहुजनांचा पक्ष अशी प्रतिमा निर्माण करता आली. हा पक्ष सत्तेत आला. मात्र दुसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी पुंजीपतींचे हित साधण्यासाठी कायदे करण्यास सुरवात केली आहे. देशातल्या कंपन्या व बहुराष्ट्रीय कंपन्यांना कायदे करुन मदत केली जात आहे. दुसरीकडे ज्या कारखान्यांत तीनशे पेक्षा अधिक कामगार असतील त्यांना काढून टाकण्याचे अधिकार दिले आहेत. कामगार, शेतकरी यांना उध्वस्त केले जात आहे. पुन्हा हे सरकार सत्तेत आले तर कदाचीत मोदी सरकार तीनशेची ही मर्यादा दिड हजारावर नेतील आणि नव्वद टक्के कामगार कायदे मोडीत काढतील. कामगारांना आपल्या न्याय हक्कांसाठी संघटना करता येणार नाही. देशात कोणत्याही कामगाराला आपल्या हिताचे संरक्षण करण्यासाठी हक्क राहणार नाही. 
.... 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख