राष्ट्रवादी काँग्रेसचा निफाड नगरपंचायतीत स्वबळावर नारा! 

जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वानरसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत राज्यात सतेतत असणाऱ्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने पंचायत समिती निवडणुकीत भाजपसोबत जाऊन आघाडीचा धर्म मोडला. ल्यामुळे नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसने दिले.
Siddharth Vanarase
Siddharth Vanarase

निफाड : आगामी निफाड नगरपंचायत निवडणुकीच्या धर्तीवर निफाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक पक्ष निरीक्षक जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वानरसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत राज्यात सतेतत असणाऱ्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने पंचायत समिती निवडणुकीत भाजपसोबत जाऊन   आघाडीचा धर्म मोडला. ल्यामुळे नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसने दिले.

जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वानरसे यांची निरीक्षकपदी निवड झाल्यानंतर शनिवारी पहिलीच बैठक निफाड येथील रुद्राय हॉटेल येथे झाली. या बैठकीत ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवारांचे आगामी निवडणुकीबाबतची मते जाणून घेण्यात आली. ज्येष्ठ नेते शिवाजी ढेपले यांनी पुष्पगुच्छ देऊन सिद्धार्थ वनारसे यांचे स्वागत केले. बापूसाहेब कुंदे, नितीन कापसे, जानकीराम धारराव, जावेद शेख, कैलास धारराव व शिवाजी ढेपले यांनी मनोगत व्यक्त केले. वनारसे यांची निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर यांचे आभार मानले.

निफाड नगरपंचायतीच्या बाबतीत पक्षाच्या प्रदेशस्तरावरून जो निर्णय येईल तो मान्य करत आपल्याला स्वबळावर निवडणूक लढवायची, आघाडी करायची की महाविकास आघाडी याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. येत्या काळात प्रत्येकाने निवडणूक पक्षाध्यक्ष शरद पवार, आमदार दिलीप बनकर आणि घड्याळ या चिन्हाकडे बघून लढवली पाहिजे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वात आधी शिवसेनेने पंचायत समितीत भाजपासोबत आघाडी करत आघाडी धर्म मोडला आहे. हे लक्षात घेत आपल्याला पुढे जावे लागेल, असे वनारसे म्हणाले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, शहराध्यक्ष तनविर राजे, इरफान सैय्यद, सुरेश कापसे, किसन कुंदे, रघु कुंदे, सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब कुंदे, कैलास कुंदे, माणिक कुंदे, उत्तम कुंदे, भास्कर धारराव, सदाशिव धारराव, कैलास धारराव, बाळासाहेब रंधवे, मंगेश लहामगे, दिलीप कापसे, गणेश कापसे उपस्थित होते. 
...
      

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com