राष्ट्रवादी कॅांग्रेस म्हणते, करदात्यांना वेठीस धरणे थांबवा

महापालिका प्रशासनाने करदात्यांना वेठीस धरू नये. अन्यथा महापालिका प्रशासनाला गंभीर परिणामांनासामोरे जावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी कॅांग्रेसकडूनयावेळी देण्यात आला.
NCP Nashikroad
NCP Nashikroad

नाशिक : सध्या शहरातील विविध राजकीय पक्ष नागरिकांच्या समस्यांबाबत सक्रीय झाले आहेत. आज राष्ट्रवादी कॅांग्रेसने महापालिकेच्या विभागीय कार्यालयावर शक्तीप्रदर्शन करीत निदर्शने केली. महापालिका प्रशासनाने करदात्यांना वेठीस धरू नये. अन्यथा महापालिका प्रशासनाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी कॅांग्रेसकडून यावेळी देण्यात आला. 

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात सातत्याने आंदोलने होऊ लागले आहेत. या सर्व आंदोलनांना मागे टाकणारे आंदोलन झाले. त्यासाठी राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष प्रभागात जाऊऩ नागरिकांशी संवाद साधला. त्यांना भेडसवाणा-या समस्यांची यादी करुन त्याचे निवेदन तयार केले. सहा प्रभागांतील जवळपास पन्नासहून अधिक समस्यांची जंत्रीच महापालिकेच्या अधिका-यांना सादर केली. पिण्याचे पाणी, अस्वच्छता, कोरोनाचा प्रसार, नादुरुस्त रस्ते, रखडलेली विकासकामे, एलईडी दिवे, नादुरुस्त पथदीप, विद्युत तारा, घंटागाडी, सफाई कर्मचारी व त्यांच्या कामातील अनियमितता आदी समस्यांच्या तक्रारींनी महापालिका अधिकारी देखील आचंभीत झाले. 

महापालिकेत भाजप सत्तेत आहे. शिवसेना त्यांच्या विरोधात सातत्याने आरोप करीत आंदोलन करीत आहे. त्यामुळे शहरातील विकास व समस्यांच्या प्रश्नांवर सध्या शहरात रोजच आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्या तुलनेत राष्ट्रवादी कॅांग्रेसने थेट नागिरकांशी संपर्क करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शहरातील या नागरी समस्या टप्प्या टप्प्याने सर्व विभागीय कार्यालयांत मांडल्या जाणार आहेत. त्याची सुरवात नाशिक रोडला विभागीय अध्यक्ष मनोहर कोरडे यांच्या नेतृत्वाखाली आज झाली.   

या आंदोलनात  शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक कॅांग्रसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, व्यापारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, नगरसेवक जगदीश पवार, विक्रम कोठुळे, अनिल भडांगे, चैतन्य देशमुख, प्रशांत वाघ, वंदना चाळीसगावकर, सुरेखा निमसे, सौ. पठारे, राहूल तुपे, अशोक खालकर, रमेश औटे, संजय पोरजे, डॅा युवराज मुठाळ, शांताराम भागवत, शिवा भागनत, वसंत अरिंगळे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाले होते. 
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com