एकनाथ खडसेंचा मानसिक छळ थांबवा! - NCP Warn, Stop Eknath Khades`s mental harassment, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

एकनाथ खडसेंचा मानसिक छळ थांबवा!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

केंद्र सरकार किंवा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांविरोधात बोलल्यास ‘ईडी’चा वापर भाजपच्या कार्यालयातून होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना अशाच प्रकारे नाहक त्रास दिला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने केला. या कारवाईचा निषेध करीत मंगळवारी तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देण्यात आले. 

भुसावळ : केंद्र सरकार किंवा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांविरोधात बोलल्यास ‘ईडी’चा वापर भाजपच्या कार्यालयातून (ED action against maharashtra leaders from BJP Office) होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना अशाच प्रकारे नाहक त्रास दिला जात आहे, (Harassment of Eknath Khadse is the same case) असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीने केला. (NCP Women wing warns Government) या कारवाईचा निषेध करीत मंगळवारी तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देण्यात आले. 

श्री. खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तत्काळ ‘ईडी’कडून चौकशी सुरू झाली. यात राजकीय वास असल्याचे दिसून येते. भाजपने श्री. खडसे यांच्या कुटुंबीयांवर कुरघोडी करण्याचा केविलवाणा प्रकार सुरू केला असून, हा प्रकार तत्काळ थांबवून त्यांचा मानसिक छळ थांबवावा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

श्री. खडसे हे बहुजन समाजाचे नेते आहेत. ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. त्यामुळे पक्षांतर्गत राजकारणातून त्यांना सातत्याने राजकीय त्रास देण्यात आला. भाजप सत्तेत असताना पक्षाच्या राज्यातील ठराविक नेत्यांनी त्यांच्या विरोधात सातत्याने कारस्थान करून त्यांची राजकीय कारकीर्द अडचणीत कशी जाईल याची व्यवस्था केली. ते पक्षातून बाहेर पडल्यावर तर त्यांचेअधिकच पित्त खवळले आहे. त्याामुळे अद्यापही ती कारस्थाने सुरुच आहेत. जळगाव जिल्ह्यातील जनतेला हे सर्व ज्ञात आहे. त्यामुळे ते अशाप्रकारे त्रास देणाऱ्यांना योग्य वेळी धडा शिकवतील.   

निवेदनावर राष्ट्रवादी महिला आघाडी शहराध्यक्ष नंदा निकम, प्रकाश निकम, विलास लढे, सीता बाविस्कर, आरीफ खाटीक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 
...
हेही वाचा...

दोन मंत्री, तीन आमदार... तरीही शेतकरी बेजार!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख