कोरोना रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रक्तदान मोहीम! - NCP Vikram Kothule Blood donation campaign, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

कोरोना रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रक्तदान मोहीम!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 मे 2021

नाशिक शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विक्रम कोठुळे यांनी रक्तदानाची मोहीम सुरु केली आहे. 

नाशिक : नाशिक शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विक्रम कोठुळे यांनी रक्तदानाची मोहीम सुरु केली आहे. 

आज शहरात विहितगाव येथे त्याची सुरवात झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक युवकांनी त्यात भाग घेऊन रक्तदान केले. शहरात गेले काही दिवस पक्षातर्फे कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना विविध प्रकारे मदत केली जाते. रुग्णांना उफचारासाठी दाखल करण्यासाठी मदत करणे, औषधे व अन्य साहित्याची मदत केली जात आहे. रक्त व प्लाझ्मा उपलब्धतेसाठी मार्गदर्शन केले जात आहे. शहरात विविध भागात रक्तदान करण्यात आले. त्याअंतर्गत आज विहितगाव येथे रक्तदान शिबिर झाले. यापुढेही सहराच्या अन्य भागात रक्तदाना शिबिरांसाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकरोड विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे, देवळाली विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे, नगरसेवक जगदीश पवार, शिवाजी हांडोरे, डॉ. युवराज मुठाळ, संजय हांडोरे, विष्णू हांडोरे, प्रकाश हगवणे, बाळासाहेब कोठुळे, मनोज ठाकरे, ताहीर शेख, मनिष हांडोरे, रवींद्र धुर्जंड, महेंद्र कासार, शुभम कर्डीले, सनी पाळदे, प्रशांत अरिंगळे, राहुल पवार, संकेत भोसले, सर्वेश सकट, बाळा देवकर आदींसह समर्थ सोशल ग्रुपचे पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले. 
....

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख