जयंत पाटलांच्या फिरकीने पदाधिका-यांची उडाली भंबेरी - NCP State president Jayant patil tweest on Office bearers Speech. NCP Politics | Politics Marathi News - Sarkarnama

जयंत पाटलांच्या फिरकीने पदाधिका-यांची उडाली भंबेरी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

विदर्भ आणि खान्देशातील पहिल्या टप्प्याच्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा आज येथे समारोप झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यासपीठावरुन बोलताना महत्वाच्या पदाधिका-यांची झाडाझडती घेतली. त्यांनी या पदाधिका-यांची चांगली फिरकी घेतल्याने हे पदाधिकारी घामाघुम झाले.

जळगाव : विदर्भ आणि खान्देशातील पहिल्या टप्प्याच्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचा आज येथे समारोप झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यासपीठावरुन बोलताना महत्वाच्या पदाधिका-यांची झाडाझडती घेतली. त्यांनी या पदाधिका-यांची चांगली फिरकी घेतल्याने हे पदाधिकारी घामाघुम झाले. 

या कार्यक्रमात विविध पदाधिका-यांनी जोशात भाषणे केली. विदर्भापासून सुरु झालेली परिवार संवाद यात्रा सतरा दिवसांचा प्रवास करुन आज तीचा जळगाव येथे तीचा समारोप आज झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष पाचील यांनी उपस्थितांची चांगलीच फिरकी घेतली. प्रारंभी कार्यकर्ते व पदाधिका-यांनी जोमात आपल्या घोषणा दिल्या. मात्र प्रदेशाध्यक्षांच्या फिरकीने हा उत्साह लवकरच मावळला, 

शहराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी यावेळी अतीशय उत्साहात भाषण करीत विरोधी पक्षाच्या कामकाजावर टिका केली. त्यांच्या भाषणाचा समारोप झाल्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या हाती माईक घेतला. माईक घेतल्यावर त्यांनी बारीक सारीक तपशील विचारायला सुरवात केली. या फिरकीने पदाधिका-यांची उत्तरे देताना अक्षरशः भंबेरी उडाली. 

शहराध्यक्ष अभिजीत पाटील यांचे भाषण झाले. ते म्हणाले, की पद मिळाले की स्थानिक कार्यकारीणी  आणि बुथ स्तरावरील कार्यकारीणी तयार केली नाही. त्यामुळे ही कार्यकारीणी सक्षम करण्यासाठी सध्या जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी कार्यकारीणीत महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला धुळगावचे जळगदाव करायचे. आपल्या समस्या सोडवायच्या असतील तर आपल्या पक्षाचा महापौर विराजमान झाला पाहिजे.येणा-या काळात ही स्थिती बदलण्यासाठी बुथ स्तरीय कार्यकारीणी सक्रीय केली पाहिजे. तरच त्याचा लाभ होईल, अशी भावना पदाधिका-यांनी व्यक्त केली.    

त्यावर जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, तुला अजुन काही सांगायचे आहे का?. त्यावर श्री. पाटील यांनी महापालिकेच्या कामकाजाबाबत तक्रारी केल्या.त्यावर त्यांना थांबवत पाटील म्हणाले, जळगाव महापालिकेचे जाऊ द्या, आत्ता आपण पक्षाच्या संघटवनात्मक कामकाजाविषयी बोलू.  ते म्हणाले, बुत किती आहेत. पदाधिकारी म्हणाले, 365. त्यापैकी किती प्रमुख नेमले आहेत. त्यावर उत्तर आले 162. पाटील म्हणाले, यातील किती येथे उपस्थित आहेत. श्री. पाटील म्हणाले, त्यांना बोलावलेलेच नाही. 

त्यानंतर जयंत पाटील म्हणाले, जळगाव शहर कार्यकारीनीत किती पदाधिकारी आहेत. तेव्हा उत्तर आले 43. किती लोक हजर आहेत, असे म्हणत जयंत पाटील यांनी लगेच हजेरी घेण्यास सुरवात केली. तेव्हा स्टेजवर बसलेल्यांसह 43 पैकी केवळ 23 सदस्य उपस्थित असल्याचे आढळले. त्यामुळे शहराध्यक्ष अभिजित पाटील ायंना खजील होण्याचा प्रसंग निर्माण झाला. 

जळगावचे शहराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी शिवाजीनगर भागातील एका उपाध्यक्षाला स्टेजवर बोलावून चौकशी सुरु केली. शहरातील पक्षाच्या पदाधिकारी, संघटना याविषयी माहिती सांगण्याच्या सूचना केल्या, यावेळी ते म्हणाले,, गेल्या सहा महिन्यात किती वेळा बैठका झाल्या. ते म्हणाले दोन ते तीन वेळा बैठका झाल्या. त्यात यापुढे काय करायचे याचा आम्ही चर्चा करतो. पक्ष संघटना वाढविण्यासाठी काय करायचा विचार आहे?, पुढचे शिल्लक  बुथ व त्यावरील  नेमणूका कधी होतील ? या प्रश्नांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पदाधिका-यांची चांगलील फिरकी घेतली. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच धास्तावले होते. 

यावेळी सुरेश चव्हाण, रवीकांत वर्पे, महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मेहबुब शेख, अभिषेक पाटील, कल्पनाताई पाटील, सक्षनाताई सल्गर, सुनिल गव्हाणे, अभिजित पाटील आदींची भाषणे झाली. 
... 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख