निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने सुरु केली बेरीज!

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शनिवारी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. माजी खासदार समीर भुजबळ व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला.
Sameer Bhujbal F
Sameer Bhujbal F

नाशिक : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शनिवारी विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. (Various social workers joine NCP on Saturday) माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) व शहराध्यक्ष रंजन ठाकरे (Ranjan Thakre) यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. 

कोरोना महामारीची गंभीर परिस्थिती महाविकास आघाडी सरकारने मोठ्या अडचणीचा सामना करत योग्यरीतीने हाताळली. केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत झाली नाही. या परिस्थितीमध्ये आघाडी सरकारने वाट काढली. त्यामुळे जनता महाविकास आघाडीकडे आकर्षित होऊ लागली आहे. नाशिकच्या विकासासाठी पालकमंत्री छगन भुजबळ पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह विविध विकासकामांना सुरवात झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील, असा दावा समीर भुजबळ यांनी केला. निवृत्त पोलिस निरीक्षक पांडुरंग पाटील, निवृत्त मुख्याधापक विश्वनाथ पवार, दिलीप नागरे, निवृत्त पाटबंधारे अधिकारी शंकर शिंदे, प्रवीण वानखेडे, लक्ष्मण मोरे, शरद पाटील, प्रकाश माळी, पोपटराव शिंदे, हरिभाऊ काळे, नारायण म्हस्के, माणिक ढग, महादू गवई, चिरायू कोल्हे, सिद्धार्थ आंभोरे, लखन कारके, शुभम गायकवाड, नागजी येथील शाहरुख सय्यद, विकार शेख रज्जाक, वडाळागाव येथील फारुख शहा आदींनी पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर सरचिटणीस संजय खैरनार यांनी केले.

यावेळी माजी खासदार देवीदास पिंगळे, प्रदेश पदाधिकारी नाना महाले, दिलीप खैरे, अर्जुन टिळे, कोंडाजी आव्हाड, निवृत्ती अरिंगळे, कविता कर्डक, मधुकर मौले, अंबादास खैरे, गौरव गोवर्धने, धनंजय निकाळे, सलीम शेख, सोनिया होळकर, समाधान जेजुरकर आदी या वेळी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com