आता, पेट्रोलही १०५ वर थांबेल..रोहिणी खडसेंचा भाजपला टोला

रोहिणी खडसेयांनीभारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे.
Sarkarnama Banner - 2021-07-03T134238.476.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-03T134238.476.jpg

जळगाव  : पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०५ रुपये झाले आहेत, यावरून  राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहिणी खडसे Rohini Khadse यांनी आता ते तिथेच थांबेल, असे म्हणून भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे Eknath Khadse यांच्या कन्या अँड रोहिणी खडसे यांनी ट्विटरवरून भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला केला आहे. कोणाचेही नाव न घेता त्या टि्वटवरुन टीका करीत असतात, त्यांच्या अशा ट्विटमुळे यापूर्वी राजकीय वाद झाले आहेत. ncp rohini khadse criticize bjp petrol hike

अँड. रोहिणी खडसे यांनी आज पेट्रोलच्या वाढलेल्या किमतीचा संदर्भ देऊन टिका केली आहे. पेट्रोलचे दर आता १०५ रुपये प्रति लिटर झाले आहेत. त्याला अनुसरून त्यांनी म्हटले आहे,की, ''अरे, पेट्रोल पण पोहाचले १०५. बहुधा तिथेच थांबेल तेही!''

भारतीय जनता पक्षाला गेल्या विधानसभा निवडणुकीत १०५ जागा मिळाल्या होत्या. मात्र त्यांना सत्ता मिळू शकली नाही, ते तिथेच थांबले, त्यावरच खडसेंनी भारतीय जनता  पक्षाला टोला लगावला आहे. दिल्लीत आज पेट्रोल ९९. १६ रुपये झाले. दिल्लीत डिझेल ८९. १८ रुपये लीटर आहे तर, मुंबईत पेट्रोल १०५ रुपयांवर पोहोचले आहे.

यापूर्वी, ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास ठाकरे सरकारच जबाबदार असल्याची टीका भाजपाच्या नेत्यांनी केल्यानंतर रोहिणी खडसेंनी टोमणा मारला होता. ''भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? आता गळा काढण्यात अर्थ नाही,'' असे ट्विट रोहिणी खडसे यांनी केले होते.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर (Jarandeshwar Sugar Factory )कारखान्यावर ईडीने नुकतीच कारवाई केली आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीनं (ED) हा साखर कारखाना जप्त केला. त्यानंतर राजकीय वर्गातून या कारवाईवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील ५४ कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करण्यासंदर्भात आज अमित शहा यांना पत्र लिहिणार आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.  

 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com