`राष्ट्रवादी`च्या प्रेरणा बलकवडे यांनी सुरु केले कोविड सेंटर

कोरोना रुग्णांना उपचाराच्या सुविधा मिळणे दिवसेंदिवस बिकट झाले आहे. त्यामुळे वीस हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या भगूरसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे यांनी स्वतःच्या जागेत कोविड सेंटर उभारले आहे.
Prerana Balkawde
Prerana Balkawde

नाशिक : कोरोना रुग्णांना उपचाराच्या सुविधा मिळणे दिवसेंदिवस बिकट झाले आहे. त्यामुळे वीस हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या भगूरसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे यांनी स्वतःच्या जागेत कोविड सेंटर उभारले आहे. अन्य नेते राजकीय आरोप-प्रत्यारोपांत रमले असतांना सौ बलकवडे यांनी थेट कृतीतून आपले योगदान दिल्याने कोरोनाच्या तणावात एक चांगली सकारात्मक बातमी म्हणून ती चर्चेत आहे. 

सौ. बलकवडे यांच्या झेप फाऊंडेशनने त्यासाठी विशेष पुढाकार घेतला. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने त्यात विविध सुविधा व वैद्यकीय उपचाराच्या सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने या कोंविंड सेंटरला मंजूरी दिली. माजी नगराध्यक्ष अॅड गोरखनाथ बलकवडे यांनी याबाबत माहिती दिली. बलकवडे  परिवाराकडून प्रशासनाला सेंटर सुरु करण्यासाठी मोफत जागा व खाटांची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

भगुर शहराची लोकसंख्या वीस हजार असुन शासकीय रुग्णालयात उपचारासाठी सुविधा नाहीत. येथे भगुर नगरपालिकेचा दवाखाना आहे. मात्र त्यात पुरेशा सुविधा नाहीत. नागरिकांना खाजगी दवाखान्यात उपचार घेणे आर्थीकदृष्ट्या परवडत नसल्याने अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण देवळाली कॅन्टोनमेंट तसचे महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यात अनेकांना बेड उपलब्ध नाहीत. अनेक रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. यातील अनेक कोरोनाग्रस्त भगुरला सार्वजनिक ठिकाणी फिरतांना दिसतात. त्यातून शहरात रुग्ण वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे भगुरला कोविड सेंटर मिळावे याकरिता सौ. बलकवडे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार बलकवडे व्यायाम शाळेच्या हॅालमध्ये पन्नास खाटांच्या कोरोना केंद्राला मंजुरी मिळाली. ते वकरच सुरू होणार आहे.यात भगुरच्या नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com