कार्यकर्त्याच्या फेसबुक लग्नाला `राष्ट्रवादी`च्या मंत्र्यांची प्रत्यक्ष हजेरीतून गर्दी

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड रवींद्र पगार यांचे चिरंजीव आकाश व जागृती देवरे यांचा विवाह आज झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुकद्वारे शुभेच्छांचे आवाहन यावेळी करण्यात आले होते. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ यांसह विविध नेत्यांनी लग्नाला हजेरी लावल्याने चर्चेचा विषय ठरला.
कार्यकर्त्याच्या फेसबुक लग्नाला `राष्ट्रवादी`च्या मंत्र्यांची प्रत्यक्ष हजेरीतून गर्दी

नाशिक : नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड रवींद्र पगार यांचे चिरंजीव आकाश व जागृती देवरे यांचा विवाह आज झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुकद्वारे शुभेच्छांचे आवाहन यावेळी करण्यात आले होते. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ यांसह विविध नेत्यांनी लग्नाला हजेरी लावल्याने चर्चेचा विषय ठरला.  

आकाश पगार हे राष्ट्रवादी  काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. वडील पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात ते विविध जबाबदारी पार पाडतात. जिल्हाध्यक्षांच्या घरचे लग्न असल्याने कार्यकर्ते उपस्थित राहणार हे ओघाने आलेच. त्यासाठी त्यांनी शहरात कोरोनाचा संसर्ग सुरु आहे. त्यामुळे निमंत्रण पत्रिकेतच हा विवाह फेसबुक लाईव्ह होणार आहे. सगळ्यांनी फेसबुकद्वारेच शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती केली होती. 

विवाह सोहळ्यात मास्क व सोशल डिस्टन्स पाळूनच कार्यक्रम करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र या विवाहास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी आमदार हेमंत टकले, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, आमदार सरोज आहिरे, माजी आमदार जयवंतराव जाधव, डॉ. शेफाली भुजबळ यांसह विविध नेत्यांनी हजेरी लावली. नेते आले, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्ते ओघाने आलेच.  त्यामुळे कार्यकर्त्यांची गर्दी झालीच.
...
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=ae86FeiIZH8AX_q-82h&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=ae5dbb7f6f9195173bebabca908cca27&oe=5F8FE6A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com