राष्ट्रवादीच्या पुनर्वैभवाची मदार आता एकनाथ खडसेंवर! - NCP expansion responsiblity on Eknath Khadse`s Shoulder, Jalgaon POlitics | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीच्या पुनर्वैभवाची मदार आता एकनाथ खडसेंवर!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ताकतवान होती. मात्र बदलत्या काळात पक्षालाही वादाचे ग्रहण लागले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही वेळी वेळी जिल्ह्यात पक्षाला ताकद दिली. सद्यस्थितीत केवळ एक आमदार आहे. मात्र आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यामुळे पक्ष पुन्हा उभारी घेईल असे चित्र आहे.

जळगाव : राष्ट्रवादी लई भारी .... राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रचारात वाजणारे हे गीत आहे. खरोखरच काही काळ जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस ताकतवान होती.(NCP was leading party in Jalgaon) मात्र बदलत्या काळात पक्षालाही वादाचे ग्रहण लागले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही (Sharad pawar given support for Jalgaon) वेळी वेळी जिल्ह्यात पक्षाला ताकद दिली. सद्यस्थितीत केवळ एक आमदार आहे. मात्र आता ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यामुळे पक्ष पुन्हा उभारी घेईल असे चित्र आहे. 

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेची घोषणा केली. यावेळी राज्यात त्यांच्या सोबत काही मोजके आमदार आले. त्यात जळगाव जिल्ह्यातून पारोळा येथील डॉ. सतीष पाटील, चोपडा येथील अरुणभाई गुजराथी  हे होते. ईश्र्वरलाल जैन, मधुकरराव चौधरी, अनिलदादा देशमुख, प्रल्हादराव पाटील, मु.ग. पवार हे जिल्ह्यातील नेते सोबत होते. वरणगाव येथील जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ  इंगळे हे पक्षाचे जळगावचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यावेळी पक्षाला खरे आव्हान काँगेस पक्षाचे होते. शिवसेना व भारतीय जनता पक्षाने ग्रामीण भागात आपली पाळेमुळे बळकट करणे सुरू केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस जिह्यात बळकट करण्यासाठी जिल्हयातील नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. पक्षाच्या राज्यस्तरीय नेतृत्वाने जिल्ह्यात पक्षाला ताकद दिली. २००४ मध्ये सुरेशदादा जैन हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यामुळे पक्षाची ताकद आणखी  वाढली. जळगाव नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट झाली. यावेळी झालेल्या जळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव मोरे निवडून आले होते. त्यांच्या माध्यमातून पक्षाचा पहिला खासदार झाला.२००८ मध्ये पक्षाला मोठे यश मिळाले. पक्षाचे जिह्यात सहा आमदार निवडून आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष बनला होता.  गुलाबराव देवकर हे पालकमंत्री होते. त्यांनी त्या काळात पक्ष वाढविण्यासाठी खुप प्रयत्न केले. 

ही वाटचाल सुरु असताना, घरकुल प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याचा पक्षाला मोठा फटाका बसला. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत डॉ. सतीष पाटील हे एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले. पुढे मात्र पक्षाला फारसे यश मिळू शकले नाही. आज जळगाव महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही नगरसेवक नाही.  अमळनेर येथील अनिल पाटील हे एकमेव आमदार आहेत. त्यामुळे आज जिल्ह्यात पक्षापुढे विस्ताराचे आव्हान आहे. ची स्थिती नाजुक कमजोर आहे. अॅड. रवींद्र पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत.

भाजपचे नेते, माजी मंत्री खडसे यानी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने जिल्ह्यात पक्षाला बळकटी येईल अशी अपेक्षा आहे. पक्षाने खडसे त्यांची विधान परिषदेसाठी शिफारस केली आहे. राज्यपालांकडून अद्याप त्याची घोषणा झालेली नाही. मात्र खडसे यांच्यासोबत त्यांचे भाजप मधील समर्थक देखील भाजपला राम राम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. आगामी काळात इतर देखील सहकारी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिह्यात श्री. खडसे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला पुन्हा उभारी येईल, अशी अपेक्षा आहे. 
....

हेही वाचा...

`मनसे`चे दातीर बनले दिलीपभाई `बीए`

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख