`राष्ट्रवादी` म्हणते, आमदारांनी 2 कोटींचा हिशेब हवा, अन्यथा लक्षवेधी आंदोलन

नाशिकच्या आमदारांनी सातपूरच्या नागरीकांसाठी काहीही सुविधा व विकास कामे केलेली नाहीत. दरवेळी त्या निवडणूका आल्या की सातपूर बसस्थानकाच्या भूमिपुजनाचे नाव पुढे करतात. प्रत्येक्षात हे काम अत्यंत निकृष्ठ आहे, अशी तक्रार राष्ट्रवादी कॅंग्रेसने केली आहे.
`राष्ट्रवादी` म्हणते, आमदारांनी 2 कोटींचा हिशेब हवा, अन्यथा लक्षवेधी आंदोलन

नाशिक : नाशिकच्या आमदारांनी सातपूरच्या नागरीकांसाठी काहीही सुविधा व विकास कामे केलेली नाहीत. दरवेळी त्या निवडणूका आल्या की सातपूर बसस्थानकाच्या भूमिपुजनाचे नाव पुढे करतात. प्रत्येक्षात हे काम अत्यंत निकृष्ठ आहे. त्यामुळे त्यांनी दोन कोटींचा हिशेब द्यावा, अन्यथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदन देऊन कामाची चौकशी करु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिका-यांनी दिला आहे.

यासंदर्भात पदाधिका-यांनी निवेदन देऊन आंदोलन केले. सातपूरमधील गत वैभव असलेले असे सातपूर बसस्थानक   गेल्या १५ पंधरा वर्षांपासून सातपूरकरांच्या प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत दोन आमदारांच्या कालखंडात हे बसस्थानक अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने वेळोवेळी आंदोलने केले आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांचे डोळे उघडले परंतू नेहमी निधी अभावी काम रखडवले जाते. त्यासाठी विविध कारणे दिली जातात. वेळकाढूपणा केला गेला आहे. 

विधानसभेच्या निवडणुका आल्या, की या बसस्थानकाच्या उद्घाटनाचे नाटकं सुरू होते. सातपूरमधील नागरिकांना फसवितात. मात्र आता हे सहनशक्तीच्या पलिकडे गेले आहे. या बसस्थानकसाठी दोन कोटी खर्च झाल्याचे सांगीतले जाते. परंतू दोन कोटी रुपयांची वास्तू कशी असावी?. काहीं जागरूक नागरिकांनी त्याबाबत तक्रारी केल्या आहेत. बसस्थानकातील प्लास्टर पडून गेले  आहे.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी येथे  प्रत्यक्ष पाहणी केली . निकृष्ट काम झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी आंदोलन केले. या कामासाठी आतापर्यंत पाच ते सहा कॉन्ट्रॅक्टर बदलण्यात आले आहेत. ते कशासाठी झाले याचे उत्तर मिळाले पाहिजे. या कामाची चौकशी करुन सदर अधिकारी व स्थानिक आमदार यांनी लिखीत उत्तर द्यावे, अन्यथा पालकमंत्री छगन भुजबळ यांना पत्र देऊन कामाच्या चौकशीची मागणी राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे केली जाईल. त्यासाठी  लक्षवेधी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सातपुर विभागीय अध्यक्ष जीवन रायते यांनी दिला. उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव,  सरचिटणीस विकास सोनवणे, कार्याध्यक्ष समाधान तिवडे, युवक अध्यक्ष निलेश भंदुरे, शहर चिटणीस अनीस शेख, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पुनतंबेकर, सामाजिक कार्यकर्ते नितिन बाला निगळ ,उपाध्यक्ष ऋषिराज खराटे, प्रभाग अध्यक्ष प्रदीप मुंढे, सुभाष गांगुर्डे, ज्येष्ठ नागरीक संघाचे माजी अध्यक्ष उत्तम निकम साहेब यांनी या आंदोलनात भाग घेतला. 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=2c4LnSiSfOQAX83kDjG&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=8d6270b19d206b63f605e7d83598a0af&oe=5F2128A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com