चित्राताई वाघ, किती क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार झाले सांगा हो ! - NCP Bhamre challanges BJP Chitra Wagh on Womens Politics | Politics Marathi News - Sarkarnama

चित्राताई वाघ, किती क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार झाले सांगा हो !

संपत देवगिरे
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष व एकेकाळी वाघ यांच्या सहकारी असलेल्या अनिता भामरे यांनी आव्हान दिले आहे. त्या म्हणाल्या, `चित्राताई, राज्यातील किती क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार झाले हे आकडे व सप्रमाण सादर करुन दाखवावे`

नाशिक : भाजप नेत्या चित्राताई वाघ यांनी राज्य सरकारवर केलेल्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष व एकेकाळी वाघ यांच्या सहकारी असलेल्या अनिता भामरे यांनी आव्हान दिले आहे. त्या म्हणाल्या, `चित्राताई, राज्यातील किती क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार झाले हे आकडे व सप्रमाण सादर करुन दाखवावे`

भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ नुकत्याच नाशिकला आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. यासंदर्भात त्यांच्या जुन्या सहकारी असलेल्या अनिता भामरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे वाघ यांच्या विरोधात कारवाई करण्याची परवानगी मागीतली आहे. त्यांनी सौ. वाघ यांना आव्हान दिले आहे. सौ भामरे म्हणाल्या, चित्राताई वाघ यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. तेव्हाही असेच आरोप करीत असत. मग त्या सत्ताधारी भाजपमध्ये गेल्या. आता त्यांचा पक्ष विरोधी पक्ष झाला. त्या पुन्हा जुनेच आरोप करीत आहेत, याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. 

सौ भामरे म्हणाल्या, राज्यात सध्या सर्व यंत्रणा कोरोना विरोधात लढण्यात व्यस्त आहे. भाजप व त्यांचे नेते मात्र सरकारविरोधात लढण्यात दंग आहे. त्यांना कोरोनापेक्षा राजकारण महत्वाचे वाटते. या वेळी त्यांनी राजकारण विसरुन सरकारसमवेत कोरोनाविरोधात लढले पाहिजे. कोरोनाचा पराभव झाला, की भाजप राजकारण करायला मोकळे आहे. 

त्या पुढे म्हणाल्या, भाजपच्या वाघ यांनी राज्यात क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार, महिलांवर अत्याचार आणि विनयभंगाच्या घटना घडत आहेत. या सरकारच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, असा आरोप केला होता. हा आरोप पूर्णतः खोटा आहे. राज्यात आत्तापर्यंत क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांवर बलात्कार आणि अत्याचाराच्या किती घटना घडल्या हे सप्रमाण व आकडेवारीसह सादर करावे. अन्यथा केवळ प्रसिद्धीसाठी केलेली विधान मागे घ्यावीत. कोरोना सारखे भयंकर संकट असतांना केवळ महाविकास आघाडी सरकार असल्याने राजकारणासाठी महिलांचा वापर करून सरकारची बदनामी करु नये.
...
 

https://scontent.fpnq1-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख