शहरातील खड्ड्यांच्या प्रश्‍नांवर भाजपची होतेय राजकीय कोंडी  - NCP agitation on Roads issue against BJP | Politics Marathi News - Sarkarnama

शहरातील खड्ड्यांच्या प्रश्‍नांवर भाजपची होतेय राजकीय कोंडी 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांची पावसामुळे चाळणी झाली आहे. प्रचंड खड्डे असल्याने वाहतुकीला अडथळे येण्याबरोबरच नागरिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे महापालिकातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर सातत्याने टिका होत आहे.

नाशिक : शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांची पावसामुळे चाळणी झाली आहे. प्रचंड खड्डे असल्याने वाहतुकीला अडथळे येण्याबरोबरच नागरिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे महापालिकातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर सातत्याने टिका होत आहे. यासंदर्भात शिवसेनेने माजी महापौर आणि स्थायी समिती सभापतींच्या प्रभागात वृक्षारोपण करीत आंदोलन केले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीतर्फे नाशिक रोडला खड्ड्यांत कमळ टाकत आंदोलन केले. त्यामुळे खड्ड्यांच्या प्रश्‍नांवर विरोधी पक्षांकडून भाजपची कोंडी केली जात आहे. 

शहराच्या सर्व भागात पावसाळ्यात रस्त्यांवरमोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे यातील बुहतांश रस्ते पावसाळ्याच्या तोंडावर तयार केले होते. चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्यांचेही डांबरीकरण करुन त्यावर मोठा खर्च करण्यात आला होता. हा खर्च का केला जात असल्याबद्दल नगारिकांनी तक्रार केली होती. त्याची मात्र काहीही दखल घेण्यात आली नाही. कोट्यावधींचा हा खर्च झाल्यावर अवघ्या दोन महिन्यातच या रस्त्यांची चाळणी झाली आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर खड्डे झाल्याने अनेक भागात अपघात होत आहेत. याविरोधात आता राजकीय पक्षांनी मोर्चा उघडला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्याविरोधात आंदोलन केले. 

महापालिकेतील सत्ताधारी भाजप विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फाटा येथे आंदोलन केले. यावेळी महिलांनी खड्डे व त्यात साचलेल्या पाण्यात कमळाची फुले टाकून प्रतिकात्मक निषेध केला. यावेळी शहराध्यक्षा भामरे म्हणाल्या, महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. शहरातील सर्वच रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले. त्यात पाणी साचून दुर्गंधी पसरत आहे. वाहन ेचालवितांना हे पाणी महिला, नागिरकांच्या अंगावर उडते. वाहनांच्या काचावर चिखल उडाल्याने अपघात होतात. विशेषतः नासिक रोडच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या भागातील नागिरकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील खड्यात पाणी साचल्याने खड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी धारक महिला, नागरिक अपघातग्रस्त होत आहेत. खड्यांमध्ये पाणी साचल्याने रोगराईत वाढ होऊ शकते. नासिक महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे महिलांनी भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाची फुले खड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात टाकून निषेध नोंदवला. महापौर सतिष कुलकर्णी यांनी प्राधान्याने संपूर्ण शहरातील रस्ते तात्काळ दुरूस्त करावेत. यासंदर्भात भारती जनता पक्षाने त्याची जबाबदारी स्विकारून दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी. 

आंदोलनात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस शहराध्यक्षा अनिता भामरे, नासिक रोड विभागीय अध्यक्ष रूपाली पठारे, शाकेरा शेख, रंजना गांगुर्डे, नैना दराडे, माधुरी सावंत, अश्विनी जोशी, सपना निकम, दुर्गा कल्याणी, शमीम खान आदि महिला सहभागी झाल्या.  

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख