वाहतूकदारांचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना साकडे

विक्रीकर (जीएसटी), ई वे बील आणि डिझेलच्या दरवाढीसह विविध प्रश्नांबाबत राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून वाहतुकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासन भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत यांनी नाशिकच्या वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
Arvind Sawant
Arvind Sawant

नाशिक : विक्रीकर (जीएसटी), ई वे बील आणि डिझेलच्या दरवाढीसह विविध प्रश्नांबाबत राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून वाहतुकदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासन भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत यांनी नाशिकच्या वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

वाहतूकदार विविध प्रश्नांमुळे अडचणीत सापडले आहे. याबाबत नाशिक शिवसेना वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे भारतीय कामगार सेना अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांची भेट घेतली. वाहतुकदारांच्या प्रश्नांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. मागण्यांचे निवेदन दिले. जीएसटीची प्रक्रीया अतिशय क्लीस्ट असल्याने व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात विविध स्तरावर पाठपुरावा करण्यात आला, मात्र शासनाकडून त्याबाबत कार्यवाही होत नाही. त्याचा थेट परिणाम या व्यावसायावर झाला आहे. या क्षेत्रात सर्वाधीक रोजगार निर्मिती होते. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे. उद्योग व व्यावसायांचा थेट संबंध असल्याने याबाबत तातडीने दिलासा आवश्यक असल्याचे यावेळी पदाधिका-यांनी सांगितले. 

देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या वाहतूक व्यवसायाला सामोऱ्या जाव्या लागत असलेल्या विविध प्रश्नांबाबात पदाधिकाऱ्यांनी खासदार अरविंद सावंत यांच्याशी चर्चा करून वाहतूक दारांचे प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी त्यांच्याकडे केली. यावर खासदार अरविंद सावंत यांनी वाहतुकदारांचे सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल. तसेच त्यांना योग्य त्या सोयी सुविधा पुरविण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी नाशिक वाहतूकदार संघटनेचे शिवाजी भोर, नाना पाटील, बापु ताकाटे, मनोज उदावंत, प्रविण शेजवळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com