नाशिक स्मार्ट सिटी पुणे, नागपूरला मागे टाकत महाराष्ट्रात नंबर वन - Nashik Smart city got first Place in Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिक स्मार्ट सिटी पुणे, नागपूरला मागे टाकत महाराष्ट्रात नंबर वन

संपत देवगिरे
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

नाशिक स्मार्ट सिटी कंपनीला राज्यात पहिली तर देशात पंधरावे स्थान मिळाले आहे. गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयातर्फे मिशन स्मार्ट सिटी संदर्भात रँकींग जाहीर केले आहे.

नाशिक :  नाशिक स्मार्ट सिटी कंपनीला राज्यात पहिली तर देशात पंधरावे स्थान मिळाले आहे. गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयातर्फे मिशन स्मार्ट सिटी संदर्भात रँकींग जाहीर केले आहे. देशात सुरूवातीच्या ३९ क्रमांकावरून  नाशिकने १५ व्या तर राज्यात प्रथम येत पुणे व नागपूरलाही मागे टाकले आहे. 

स्मार्ट सिटी योजनेमध्ये राबविण्यात येत असलेल्या सर्व प्रकल्पांबाबत केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयातर्फे मिशन डायरेक्टर स्तरावर आढावा घेण्यात येतो. देशभरातील शंभर स्मार्ट सिटी मुल्यांकनासाठी केंद्र शासनाने पोर्टल विकसीत केले आहे. त्याद्वारे मुल्यांकनासाठी सूत्रबद्ध यंत्रणा आहे. त्याद्वारे हे  मुल्यांकन केले जाते. यामध्ये पूर्ण झालेले, सुरू असलेले, निविदा प्रक्रीयेत असलेले प्रकल्प तसेच संबंधित स्मार्ट सिटीकडून प्राप्त निधीपैकी खर्च करण्यात आलेला निधी यांचा अंतर्भाव आहे.  

सद्यस्थितीतील या प्रकल्पांमध्ये ५२ प्रकल्पांपैकी २२ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये स्मार्ट सिटी निधी, सार्वजनिक खासगी भागीदारी, सीएसआर तथा कन्वर्जन्स इत्यादी प्रकारच्या प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच स्मार्ट सिटी निधीतील ५४० कोटींचे नऊ प्रकल्प सुरू आहेत. चार प्रकल्प निविदा प्रक्रीयेत आहेत. उर्वरीत प्रकल्पांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम सूरू आहे.

गोदावरी विकास प्रकल्पांतर्गत गोदा सौंदर्यिकरण प्रकल्पातील गोदा पार्कचे काम सुरू आहे. त्यात ॲम्पी थिएटर, भुमिगत पाण्याची टाकी, हेरिटेज वॉल इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. गोदा सिव्हिल प्रकल्पातील मलनिःस्सारण तथा पावसाळी वाहिन्यांची कामे रामकुंड परिसरात हाती घेण्यात आली आहेत. ती नियोजीत कालावधीत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. होळकर पुलासमोरील स्वयंचलित गेट बसविण्याबाबतच्या प्राथमिक आराखड्यास सीडीओ मेरीने गेल्याच आठवड्यात मान्यता दिली आहे. 

पानवेली, निर्माल्य साफ करण्यासाठी ट्रॅश स्कीमर उपलब्ध केले आहे. त्याद्वारे नदीपात्रातील साफ सफाई करण्यात येत आहे. नदीतील गाळ काढण्याबाबतही प्रकल्प राबविण्यात येत आहे. पावसाळा संपताच त्या कामास सुरूवात होईल. या प्रकल्पांमुळे गोदावरी नदीचे पावित्र्य राखले जावून स्मार्ट सिटी योजनेचा मूळ हेतू साध्य होण्यास मदत होईल. नाशिक स्मार्ट सिटीटीम देशात अव्वल स्थान प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील राहिल, असा विश्वसा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
...
 

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख