नाशिकचा सराफ बाजार कोरोनामुळे आठ दिवस बंद

शहरासह सराफ बाजाराच्या परिसरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा व्यावसायिकांवरही परिणाम होऊ लागला आहे. या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येत्या मंगळवारपासून आठ दिवस शहरातील सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय व्यावसायिकांनी घेतला आहे.
नाशिकचा सराफ बाजार कोरोनामुळे आठ दिवस बंद

नाशिक : शहरासह सराफ बाजाराच्या परिसरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा व्यावसायिकांवरही परिणाम होऊ लागला आहे. या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येत्या मंगळवारपासून आठ दिवस शहरातील सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय व्यावसायिकांनी घेतला आहे.

दरम्खयान. बरदारीचा उपाय म्हणून व्यापारी, ग्राहक व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सराफ असोसिएशनने हा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी सांगितले. यासंदर्भात विविध पातळ्यांवर दक्षता बाळगली जात आहे. 

शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने शहरात विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यांना सहकार्य व मदत म्हणून सराफ व्यावसायिकांनी हा निर्णय घेतला. यासंदर्भात असोसिएशनचे अध्यक्ष राजापूरकर म्हणाले, की सराफ व्यावसायिक नेहमीच स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवून असतात. त्यामुळे महापालिका व जिल्हा प्रशासनाने शहरात सुरू केलेल्या तपासणीत कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत आहेत. शहरातील संसर्गाची ही साखळी खंडित करण्यासाठी काही सराफ व्यावसायिकांनी सूचना केल्याने ग्राहक, व्यापारी, कर्मचारी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला आहे. 

पथकास मारहाणीचा गुन्हा दाखल

कोरोनाबाधित रुग्णाच्या घरी नियमित तपासणीसाठी गेलेल्या वैद्यकीय पथकास मारहाण करून त्यांना शासकीय कामापासून परावृत्त करण्याचा प्रकरा गंजमाळ भागात घडला होता. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरात कोरोनाबाधित व्यक्तींवर नाशिक महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांना घरी सोडल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व रुग्णांची नियमित तपासणी (रुटिंग चेकअप) परिसरातील नियुक्त केलेल्या वैद्यकीय पथकाकडून केली जाते.

पंचशीलनगर, रघुकुल सोसायटी येथील रहिवासी पॉझिटिव्ह होता. त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबातील आई, पत्नी, मुलगी व मुलगा यांचे अहवालदेखील पॉझिटिव्ह आले होते. या सर्वांवर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर या रुग्णांची नियमित तपासणी स्थानिक वैद्यकीय पथकामार्फत केली जाते. ती नियमित तपासणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांच्यासमवेत आरोग्यसेविका व आशा कर्मचारी यांचे पथक गेले होते. या वेळी रुग्णाने त्या पथकास उडवाउडवीची उत्तरे देऊन आरडाओरडा केला. तपासणीसाठी येऊ नका, असे सांगत जबरदस्तीने घराबाहेर काढून पथकाला शिवीगाळ व मारहाण केली. यासंदर्भात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली. 

नाशिक महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत वैद्यकीय पथकामार्फत तपासणी केली जात असून, ही तपासणी सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असून, त्या वैद्यकीय पथकास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 
....  
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=-MCHEjIMfxQAX8IicAh&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=1bb6f9ccb1d3ab7d63991f9781d72467&oe=5F2911A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com