आता गोदावरी एक्सप्रेस सुरु झालीच पाहिजे !

अर्थव्यवस्था सुरुळीत करण्यासाठी रेल्वे सेवा पुर्वपदावर येण्याची गरज आहे. त्यासाठी कोणतिही कारणे न देता नाशिकची गोदावरी एक्सप्रेस तातडीने सुरु करावी, अशी मागणी खासदार डॅा भारती पवार यांनी केली आहे.
Bharti Pawar
Bharti Pawar

नाशिक : कोरोनामुळे नियमित रेल्वे प्रवासी गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनातून बाहेर पडण्याचे काम आता सुरु झाले आहे. अर्थव्यवस्था सुरुळीत करण्यासाठी रेल्वे सेवा पुर्वपदावर येण्याची गरज आहे. त्यासाठी कोणतिही कारणे न देता नाशिकची गोदावरी एक्सप्रेस तातडीने सुरु करावी, अशी मागणी खासदार डॅा भारती पवार यांनी केली आहे.  

कोरोना संक्रमण काळात रेल्वे सेवा सुरक्षितितेच्या कारणास्तव बाधित झाली. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम हा सर्वच प्रवासी, अप्रवासी घटकांवर दिसून आला . कोव्हीड संक्रमण काळात  आपत्कालीन सेवा सोडता सर्वच रेल्वेच्या सेवा बंद करण्यात आल्या होत्या. लॉक डाऊन संपल्यानंतर प्रवाशांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन  फक्त कोव्हीड स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आल्या. त्यात त्यांच्या कोरोनाच्या चाचण्या करून सोशल डिस्टन्स ठेवूनच त्यांना प्रवासाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे ठराविक ठिकाणीच कोव्हीड  स्पेशल रेल्वेचा थांबा असल्याने अनेक रेल्वे स्थानकांवर त्या थांबत नाहीत. त्यामुळे प्रवास करणाऱ्या असंख्य नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी खासदार पवार यांनी रेल्वे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची नासिक रोड रेल्वे स्थानकातील बैठकीत चर्चा केली.

यावेळी खासदार पवार यांनी, चर्चे दरम्यान नांदगाव येथे प्रवाशांची व पासधारक प्रवासी व यात्रेकरू यांची वाढती संख्या लक्षात घेता ह्या प्रवाशांसाठी मुंबईकडे जाणाऱ्या किमान दोन ते तीन रेल्वेचा थांबा देण्यात यावा.   प्रवाशांची गैरसोय टाळता येईल. मनमाड, नासिक ते मुंबई येथे प्रवास करणारे अनेक  चाकरमाने नोकरी निमित्ताने आपल्या कार्यालयात रोज जाऊन येऊन काम करतात. त्यांना वेळेवर दुसरी प्रवासाची साधने उपलब्ध होत नसल्याने त्यांची गैरसोय होते. त्यांची अडचण लक्षात घेता गोदावरी एक्सप्रेस सुरू करावी. त्यामुळे त्यांना नोकरी, रोजगारासाठी वेळेवर पोहचता येईल. 

मनमाड हे रेल्वे जंक्शन आहे. धुळे, नगर, जळगाव जिल्ह्यातील अनेक प्रवाशांना तसेच चांदवड, नांदगाव, येवला, मालेगाव परिसरातील जनतेलाही  मनमाड रेल्वे स्थानकावरून  सुविधा उपलब्ध आहेत. परंतु  रेल्वेसेवा बंद असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत. त्यांचाही विचार व्हावा. दरवर्षी सर्वात महत्वाचा भेडसावणारा प्रश्न जो आहे तो म्हणजे ज्या ठिकाणी रेल्वे अंडरपास आहेत त्यात नांदगाव, मनमाड, चांदवड, येवला येथील अंडर पास येतात  तेथे पावसाळ्यात पाणी साचून रहदारीचा मार्ग विस्कळित होतो .तेथे पाणी काढण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो . अशा ठिकाणी योग्य ती व्यवस्था करून तो प्रश्न कायमस्वरूपी तडीस लावावा .

या बैठकीस विवेक गुप्ता, युवराज पाटील यांसह रेल्वेचे विविध अधिकारी उपस्थित होते.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com