संकटात मदतीला आले, त्या कोरोना योद्ध्यांना विसरु नका !

कोरोनाच्या संकटात वैद्यकीय तज्ञ, कर्मचारी तसेच विविध घटकांनी अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडली. स्वतःचा जीव संकटात टाकून त्यांनी केलेल्या कामाचे सर्वस्तरावर कौतुक होण्याची गरज आहे.
Rahul Dhikle
Rahul Dhikle

नाशिक : कोरोनाच्या संकटात वैद्यकीय तज्ञ, कर्मचारी तसेच विविध घटकांनी अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडली. स्वतःचा जीव संकटात टाकून त्यांनी केलेल्या कामाचे सर्वस्तरावर कौतुक होण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने त्याची जाणीव ठेवावी असे प्रतिपादन आमदार अॅड राहूल ढिकले यांनी केले. 

पंचवटी परिसरातील नाशिक महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात कोविड-१९ लसीकरण मोहिमेला आज सुरवात झाली. यावेळी आमदार अॅड. ढिकले बोलत होते. वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनीच कोरोनाच्या महामारीत जीवाची पर्वा न करता या जीवघेण्या आजारासोबत तब्बल वर्षभर लढा दिला. याकाळात ज्या पद्धतीने आपण सर्वांनी नाशिककरांच्या आरोग्याची काळजी घेतली, तशीच सेवा यापुढेही द्याल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

कोरोनाचा संसर्ग झाल्यावर प्रारंभी त्यावि,यी जनतेत मोठी भिती होती. अनेक नागरिक त्याविषयी अनभिज्ञ होते. यावेळी आरोग्य सेवेतील कर्मचारी, डॅाक्टर, परिचारीका यांसह विविध घटका गरीब व गरजुंना सेवा देत होते. त्यांच्या या कामामुळे कोरोना विरोधातील लढ्याला ताकद आली. आज कोरोनाचा पराभव करण्यात या घटकांचा मोठा सहभाग आहे. त्याचे गांभिर्य व महत्व दोन्ही समाजाला समजले आहे. या घटकांचे नेहेमीच कौतुक होत राहील, असा विश्वास आमदार ढिकले यांनी व्यक्त केला. 

संपुर्ण देशभर कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा शासकीय रुग्णालय, बिटको रुग्णालय, पंचवटीतील इंदिरागांधी रुग्णालयात लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. प्रथम टप्प्यात वैद्यकीय कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका आणि पोलिस कर्मचा-यांना लस देण्यात येणार येत आहे तर दुसर्‍या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार असल्याचे डॉ. देवकर यांनी सांगितले.

यावेळी उपमहापौर भिकुबाई बागुल, पंचवटी प्रभाग समिती सभापती शितल माळोदे, इंदिरा गांधी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com