नाशिकमध्ये कायदा मोडून दहा हजार मोकाट फिरणारे आहेत तरी कोण? - Nashik Police took affidavit from 10K nashik People | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकमध्ये कायदा मोडून दहा हजार मोकाट फिरणारे आहेत तरी कोण?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 25 जुलै 2020

कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये हजारोंचे व्यवसाय ठप्प पडले. हजारो जणांचे रोजगार गेले. आर्थिक आरिष्ट आल्याने लोकांना जगण्याची भ्रांत असताना अशाही स्थितीत गुन्हेगारी कारवाया सुरुच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांनी ५८ सराईतांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.

नाशिक : कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये हजारोंचे व्यवसाय ठप्प पडले. हजारो जणांचे रोजगार गेले. आर्थिक आरिष्ट आल्याने लोकांना जगण्याची भ्रांत असताना अशाही स्थितीत गुन्हेगारी कारवाया सुरुच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांनी ५८ सराईतांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. यासंदर्भात पोलिसांनी चक्क दहा हजार जणांकडून हमीपत्र घेतली आहेत. पोलिसांच्या दृष्टीने कोरोनाच्या प्रसाराला हातभार लावणारे बेजबाबदार आहेत. 

नाशिकचे उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने विविध सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील आठ गँगच्या कारवायांना प्रतिबंध केला आहे. कोरोना महामारीने सगळ्या जगावर आरिष्ट कोसळले आहे. कोरोनाच्या आर्थिक परिणामांमुळे अनेक कुटुंबांपुढे जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बस, रिक्षा, टॅक्सी, केटरिंग, विवाह, वाजंत्री यांसह शेकडो व्यवसाय गेल्या चार महिन्यांपासून बंदच आहेत. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. ज्यांच्या टिकून आहे त्यांच्या पुढे समस्या कायम आहेत. अशा जगण्या-मरणाच्या लढाईत प्रत्येक घटकाला उदरनिर्वाह सुरू होण्याचे वेध लागले असताना गुन्हेगारांचा मात्र उच्छाद थांबलेला नाही. त्यामुळे अशा सराईतांविरोधात नाशिक शहर पोलिसांनी कारवायांचे सत्र सुरू केले आहे. चार महिन्यांच्या काळात दोन किंवा त्याहून अधिक गुन्हेगारी कारवायांत सहभाग असलेल्यांसह सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या गल्लोगल्लीच्या भाईगिरीविरोधात पोलिसांनी मोहीम राबवित तडीपारी, झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कारवायांसह इतरही प्रतिबंधात्मक कारवाया गतिमान केल्या आहेत.

दहा हजार प्रतिबंधात्मक कारवाया
पोलिस आयुक्तालयातील विभाग दोनअंर्तगत नाशिक रोड, उपनगर, सातपूर, अंबड, देवळाली कॅम्प आणि इंदिरानगर या सहा पोलिस ठाण्यांतील या कारवायांमुळे साधारण विविध भागातील आठ गँगच्या कारवायांना चाप बसणार आहे. शहरातील प्रमुख गुन्हेगारी टोळ्या कार्यरत असलेल्या या भागातील नव्याने उदयाला येऊ पहाणाऱ्या आठ गँगमधील साधारण ३२ जणांचा यात समावेश आहे. काही जण शिक्षा झालेले, तर झोपडपट्टी दादा प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत कारवाई झाल्या आहेत. याशिवाय पोलिसांनी दहा हजारांच्या आसपास प्रतिबंधात्मक कारवाया करताना हमीपत्र लिहून घेणे, चांगल्या वर्तनाची बंधपत्र घेत कारवाई केल्या आहेत.
....

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख