काय? उज्जैनला अटक झालेल्या विकास दुबेचा नाशिकमध्येही सुरु होता शोध!

उत्तर प्रदेशात आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणी फरारी संशयित विकास दुबेला आज उज्जैन येथे पकडण्यात आले. मात्रपोलिस त्याचा नाशिकमध्ये देखील शोध घेत आहेत. विशेषतःऔद्योगिक वसाहतीतील भंगार आणि सशश्‍त्र सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या एजन्सीजशी त्याचे लागेबांधे असल्याची चर्चा जोरात आहे.
काय? उज्जैनला अटक झालेल्या विकास दुबेचा नाशिकमध्येही सुरु होता शोध!

नाशिक : उत्तर प्रदेशात आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणी फरारी संशयित विकास दुबेला आज उज्जैन (मध्य प्रदेश) येथे अटक करण्यात आली. मात्र त्याच्या नाशिक कनेक्‍शनच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि नाशिकचे पोलिस त्याचा नाशिकमध्ये देखील शोध घेत होते. 

पोलिस याविषयी सावध आहेत. विशेषतः औद्योगिक वसाहतीतील भंगार आणि सशश्‍त्र सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या एजन्सीजशी त्याचे लागेबांधे असल्याची चर्चा जोरात होती. या चर्चा आणि बातम्यांनी नाशिक पोलिस देखील सावध झाले होते. या बातम्यांत खरच तत्थ्य आहे का?. यापांसून तर तत्थ्य असलेच तर गुन्हेगार सावध होऊ नये, यामुळे पोलिसांनी यावर सगळ्यांना खातरजमा करुनच बातम्या द्याव्यात. चर्चा करु नये, असा सबूुरीचा सल्ला दिला होता.  

नाशिक शहरातील गुन्हेगारीचा उत्तर प्रदेशशी असलेला संबंध नवा नाही. विशेषतः औद्योगिक वसाहतील रोज कोट्यावधींची उलाढाल असलेला भंगार व्यावसाय, त्यातील गुंतवणूक, गुंडगिरी यांपासून तर बंदुका असलेले सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या एजन्सीज यामध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील व्यवसायिकांचे वर्चस्व आहे. औद्योगिक वसाहतीतील अंबड लींक रोडवर हजारो उत्तर भारतीय राहतात. स्थानिकांनाही त्यांचा नाव-पत्ता सोधने कठीण होते. अगदी पोलिसांनाही त्यासाठी संबंधीत व्यवसायिकांचीच मदत घ्यावी लागते. त्यामुळे विकास दुबेचा विषय निघाल्यावर नाशिक पोलिस सतर्क झाले होते. सातपूर-अंबड लिंक रोडसह औद्योगिक वसाहतीमधील भंगार व्यावसायिक तसेच कामगार, ठेकेदार नाशिक पोलिसांच्या रडारवर आले असून, बुधवारी दिवसभर पोलिस त्यासाठी गुप्त चौकशी करत होते. 

संशयित विकास दुबेची बातमी प्रसिद्ध होताच पोलिस सतर्कतेने कामाला लागले होते. सातपूर-अंबड लिंक रोड, वडाळा परिसर तसेच जिल्हाभरातील औद्योगिक वसाहतीमधील कामगार ठेकेदारांची चौकशी सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते. काही परप्रांतीय गुन्हेगारांबाबतही माहिती गोळा करण्याचे काम या निमित्ताने पाहायला मिळत आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी विशेष पथक तयार करून परप्रांतीय गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार होती, अशी माहिती सूत्रांकडून समजते.

विकास दुबेच्या "नाशिक कनेक्‍शन' ची बातमी येताच नाशिक पोलिसांच्या धाकाने केवळ परप्रांतीय गुन्हेगारच नव्हे, तर स्थानिक गुन्हेगारही शहरातून पलायन केल्याची चर्चा रंगू लागली आहे. 
... 
 

https://scontent-frt3-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=EbhnMwHhfCsAX8JZgEO&_nc_ht=scontent-frt3-2.xx&oh=17445e9e403014da9cb2844c5b584cab&oe=5F2D0627

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com