Nashik Oxygen Tank Leakage : अजून किती बळी घेणार...दरेकर संतप्त..(video) - Nashik Oxygen Tank Leakage 22 die bjp Pravin Darekar | Politics Marathi News - Sarkarnama

Nashik Oxygen Tank Leakage : अजून किती बळी घेणार...दरेकर संतप्त..(video)

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

महापालिका आयुक्तांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. 

नाशिक : ''निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?  नाशिकच्या महापालिका आयुक्तांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. 

''निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्‍यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले,'' असे टि्वट दरेकर यांनी केले आहे.

झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऑक्सिजन टाकीला गळती झाल्याने ही दुर्घटना घडली. रुग्णालयात १५० रुग्ण दाखल होते. यामधील व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ जणांपैकी २२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी कारवाईची मागणी केली आहे.

नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. या पुढे असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. महापालिकेच्या डॅा झाकीर हुसेन या सध्या कोविच्या रुग्णांसाठी असलेल्या रुग्णालयात ऑक्सिजनच्या नव्या टाकीला गळती लागली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. यात २२ रुग्णांचे निधन झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून येथील रुग्णांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले आहे. 

आज सकाळी अकराला गॅस रिफीलींग करताना हा प्रकार घडला. येथे शंभऱहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी येथे नव्याने सिलेंटर बसविण्यात आला होता. आज सकाळी त्यात फिलींग करतांना गॅस गळती झाली. त्यामुळे धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून येथील डॅाक्टर्स तसेच अन्य कर्मचाऱ्यांना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्यत्र हलविण्यात येत आहे. त्यानुसार विविध रुग्णवाहिकांतून रुग्ण हलविण्यात आले.
  Edited by: : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख