महापालिका उभारणार दोन ऑक्सिजन प्रकल्प - Nashik NMc will execute 2 Oxigen plant, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

महापालिका उभारणार दोन ऑक्सिजन प्रकल्प

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 मे 2021

महानगरपालिकेच्या वतीने मोरवाडी आणि गंगापूर येथे हवेतील प्राणवायू शोषणारा एअर ऑक्सिजन प्लांट तयार करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज जागेची पाहणी केली. या ठिकाणी प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. 

नाशिक : महानगरपालिकेच्या वतीने मोरवाडी आणि गंगापूर येथे हवेतील प्राणवायू शोषणारा एअर ऑक्सिजन प्लांट तयार करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज जागेची पाहणी केली. या ठिकाणी प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. 

शहर व परिसरात काही दिवसांपासून ऑक्सिजनचा होणारा अपुरा पुरवठा होत आहे. त्यामुळे विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी त्यावर नियोजन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मोरवाडी, गंगापूर येथे एअर ऑक्सिजन प्लांट तयार करण्याच्या अनुषंगाने मोरवाडी येथील `यूपीएससी`च्या बाजूच्या मोकळ्या मैदानाचे तसेच प्रबोधनकार ठाकरे सभागृहाच्या बाजूच्या मोकळ्या जागेची पाहणी करण्यात आली.

गंगापूर `यूपीएससी`च्या बाजूच्या मोकळ्या जागेची पाहणी करून या दोन्ही ठिकाणी एअर ऑक्सीजन प्लांट तयार करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या एअर ऑक्सीजन प्लांटच्या माध्यमातून  जम्बो ऑक्सीजन सिलेंडर भरून देण्याची व्यवस्था करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे शहरात जाणवणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचे  नियोजन करणे शक्य करणे  होणार आहे. या पाहणीच्या वेळी मोरवाडी दवाखान्याची पाहणी करून तेथील कामकाजाची व औषध साठ्याची माहिती यावेळी आयुक्त जाधव यांनी घेतली. गंगापूर येथील दवाखान्याची पाहणी करून तेथील औषध साठा व रुग्णांना मनपाच्या वतीने दिली जात असणाऱ्या सेवेची माहिती आयुक्तांनी यावेळी घेतली. यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, विभागीय अधिकारी मयुर पाटील, नितीन नेर नोडल वैद्यकीय  अधिकारी डॉ. योगेश कोशिरे आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख