nashik nmc ward 20 1000 peoples covid Test | Sarkarnama

भाजपकडून प्रभाग 20 मध्ये हजार नागरिकांची कोरोना तपासणी

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

भारतीय जनता पक्षातर्फे नागरिकांची कोरोना तपासणी सुरु आहे. यामध्ये घरोघर जाऊन ्परबोधन व जनजागृतीचे काम सुरु आहे. या मोहिमेत एक हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.

नाशिकरोड : येथील प्रभाग 20 मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे नागरिकांची कोरोना तपासणी सुरु आहे. यामध्ये घरोघर जाऊन ्परबोधन व जनजागृतीचे काम सुरु आहे. या मोहिमेत एक हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये कोणीही संशयास्पद रुग्ण न आढळल्याने कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.  

महापालिका शिक्षण मंडळाच्या सभापती, नगरसेविका सौ संगीता हेमंत गायकवाड आणि  भारतीय जनता पक्षाचे नाशिक रोड मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड यांच्या वतीने प्रभागात प्रत्येक घरी जाऊन वैद्यकीय तपासणी सुरु आहे. 22 जुलैपासून रोज ही तपासणी केली जाते. यामध्ये टेंप्रेचर स्क्रिनिग टेस्ट तसेच पल्स ऑक्सिमीटर टेस्ट या मोफत तपासण्या दत्त मंदीर येथील कार्यालयात सुरु आहे. या मोफत तपासणी शिबिराच्या माध्यमातून आत्तापर्यंत सुमारे एक हजाराहून जास्त लोकांनी आपली तपासणी करुन घेतली. नागरिकांसाठी हे कोरोना तपासणीचे काम यापुढेही सुरुच राहणार आहे. 

या माध्यमातुन विविध क्षेत्रातील लोकांना व मान्यवरांना अर्सेनिक अल्बम 30 या रोग प्रतिबंधक गोळ्यांचे देखील वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने महापालिका शाळा, विविध बैंकामधिल कर्मचारी, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या तेजुकाया (भाटिया) महाविद्यालय, आयुर्विमा कार्यालय, प्रभागातील सर्व नागरिकांना या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर प्रभागातील सर्व पक्षीय नगरसेवकांनीही या गोळ्यांच्या पाकिटाचे वाटप करण्यात आले. यामार्फत नाशिकरोड परिसरातील सर्व नागरिकांपर्यंत या गोळ्या पोहचवण्याचे काम नगरसेविका गायकवाड परिवाराकडून करण्यात येत आहे. कोरोना विषयी नागरीकांचे प्रबोधन व जनजागृती करण्यात येत आहे. 

प्रभागामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम, त्यावरील उपाययोजना करण्यात आली आहे. कोरोना आता घरोघरी पोहचला आहे, या अनुषंगाने प्रभागामधे प्रतिबंधक क्षेत्र असलेल्या प्रत्येक ठिकाणी सेनिटाइज़रची फवारणी करण्यात आली. त्यामुळे लोकांमधे आत्मविश्वास निर्माण झाल्याचे संयोजकांनी सांगितले.
...

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख