nashik municipal carporation opposition and ruling party together fos schamm | Sarkarnama

आरक्षण बदलाच्या घोटाळ्यासाठी महापालिकेत विरोधकांचा गोंधळ?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जुलै 2020

भाजपला विरोध करणा-या राष्ट्रवादी कॅाग्रेस व अपक्ष नगरेसवकांनी उपसूचनेद्वारे शहरातील आरक्षण बदलाचा प्रस्ताव घुसडल्याचे स्पष्ट पुढे आले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपवर आरोप करणारे विरोधक देखील घोटाळेबाज आहे की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. 

नाशिक : गेल्या आठवड्यातील महासभेत सिंहस्थातील कामांच्या सतरा कोटींची देयके देण्यासाठी विरोधकांनी टक्केवारीचा आरोप करीत गोंधळ घातला होता. त्यात सगळ्यांचे लक्ष गोंधळाकडे गेले. मात्र प्रत्यक्षात त्या आडून खुद्द भाजपला विरोध करणा-या राष्ट्रवादी कॅाग्रेस व अपक्ष नगरेसवकांनी उपसूचनेद्वारे शहरातील आरक्षण बदलाचा प्रस्ताव घुसडल्याचे स्पष्ट पुढे आले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपवर आरोप करणारे विरोधक देखील घोटाळेबाज आहे की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. 

महापालिकेत गेल्या तीस वर्षात महासभेत व बाहेर जो जास्त मोठ्याने बोलतो, आरोप करतो, तो प्रत्यक्ष त्याच कामाच्या कार्यवाहीच्या वेळी गायब तरी असतो, कींवा मौन तरी असतो. महापालिकेतील कामकाजाची ही रुढ पद्धत आहे. मात्र नव्याने सुरु असलेला गोंधळ पाहिला तर सत्ताधारी परवडले, विरोधक नको, अशी स्थिती होऊ पहात आहे. थोडक्यात जे अनधिकृत किंवा महापालिकेला नुकसान ठरणारे आहे, विरोधक ज्याला बेंबीच्या देठापासून विरोध करतात, ते काम तर होतेच, मात्र त्यानिमित्ताने अन्य कामेही होतातच. यामुळे सध्या महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला विरोध करणारे, त्यांचा विरोध खरा, की देखावा असल्याचा प्रश्न विचारला जात आहे.    

गेल्या आठवड्यात झालेल्या ऑनलाइन महासभेत तांत्रिक बिघाड दाखवून सिंहस्थाची देयके मंजूर केल्याने चुकीच्या पद्धतीने महासभा चालविली जात असल्याचा आरोप करत गोंधळ घालणाऱ्या राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार व गुरुमित बग्गा यांनी एका प्रस्तावाचा आधार घेत उपसूचनेद्वारे एका जागेचे कमर्शिअल कॉम्प्लेक्‍सचे आरक्षण वगळण्याचा प्रस्ताव दिल्याचे पुढे आले आहे. या गोंधळामागे प्रस्ताव मंजुरीसाठी दबाव तर आणला गेला नाही ना, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

ऑनलाइन महासभा झाली, त्यात सुरवातीला आवाज येत नसतानाच सिंहस्थाच्या जुन्या देयकांच्या विषयाला मंजुरी देण्यात आल्याने राष्ट्रवादीचे शेलार व अपक्ष बग्गा यांनी कंट्रोल रूममध्ये धडक देत गोंधळ घातला. महापौरांसह भाजपच्या गटनेत्यांना शिवीगाळ केली होती. दोन दिवस आरोप-प्रत्यारोपांनंतर आता काही बाबी समोर येत आहेत. ऑनलाइन महासभेला बेकादेशीर, टक्केवारीची गणिते असे ज्यांनी संबोधले, त्या शेलार व बग्गा यांनी एका उपसूचनेद्वारे आरक्षण वगळण्याची मागणी केली. जर महासभा बेकायदा असेल तर त्यांनी आरक्षण उठविण्याच्या प्रस्तावावर सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केल्याने त्यांच्याच गोंधळाच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपवर आरोप करायचे अन् स्वतः देखील त्यात सहभागी व्हायचे ही कार्यपद्धती तर नाही ना?. तसे असले तर फारसे चांगले नाही, असेच चित्र आहे. 
.... 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख