महापौर सतीश कुलकर्णींचा होणार भाजप कार्यालयात जनता दरबार - Nashik mayor Satish Kulkarni will Meet public In BJP Office | Politics Marathi News - Sarkarnama

महापौर सतीश कुलकर्णींचा होणार भाजप कार्यालयात जनता दरबार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

महापौर सतीश कुलकर्णी येत्या सोमवार(ता.२) पासून प्रत्येक सोमवारी महापौर सतीश कुलकर्णी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार भरवणार आहेत.  नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणींसाठी संपर्क करावा असे आवाहन महापौर कुलकर्णी यांनी केले आहे.

नाशिक : महापौर सतीश कुलकर्णी येत्या सोमवार(ता.२) पासून प्रत्येक सोमवारी महापौर सतीश कुलकर्णी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार भरवणार आहेत.  नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणींसाठी संपर्क करावा असे आवाहन महापौर कुलकर्णी यांनी केले आहे. 

यासंदर्भात शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेशी महापौर सवांद  साधणार आहेत. श्री. पालवे यांनी महापौर सतिश कुलकर्णी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आठवड्यातुन एकदा भाजप कार्यालयातून पदाधिकारी व कार्यकर्ते व जनतेशी सवांद साधावा अशी विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीवरून महापौर सतीश कुलकर्णी  यांनी दर सोमवारी भाजप कार्यालयातुन जनतेशी सवांद साधणार असल्याचे सांगितले. 

अशा प्रकारे जनता दरबार घेणारे कुलकर्णी हे भाजपचे पहिले महापौर आहेत. यापूर्वी उत्तमराव ढिकले यांनी महापौर तुमच्या दारी हा उपक्रम राबविला होता. त्या ते प्रत्येक शनिवारी विविध प्रभागांत दौरा करुन पदयात्रेद्वारे नागरिकांशी संपर्क करीत होते. महापौर कुलकर्णी पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार भरविणार आहेत.  

जनतेच्या विविध समस्या व गाऱ्हाणे  ऐकण्यासाठी व सोडविण्यासाठी जनतेला वेळ देता यावा म्हणून  महापौर सतीश कुलकर्णी यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले  या निर्णयाचे शहरातील पदाधिकारी तसेच  प्रदेश सरचिटणीस  आमदार देवयानी फरांदे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले,  माजी आमदार वसंत गीते, जेष्ठ नेते विजय साने, सुनील बागुल यांनी स्वागत केले आहे.  ज्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना आपल्या समस्या महापौरांकडे मांडायच्या असतील त्यांनी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. 
...
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख