नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी कोरोनाग्रस्त! - Nashik Mayor Satish Kulkarni Found Covid-19 Positive | Politics Marathi News - Sarkarnama

नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी कोरोनाग्रस्त!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

महापौर सतीश कुलकर्णी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. 

नाशिक : महापौर सतीश कुलकर्णी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. 

महापौर सतीश कुलकर्णी यांना सोमवारी थकवा अस्वस्थता जाणवू लागली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी आपला स्वॅब तपासणीसाठी दिला होता. आज सकाळी त्यांचा `आरटी-पीसीआर` अहवाल निगेटिव्ह आला. मात्र त्यांच्या छातीच्या  एक्सरेमध्ये फुप्फुसाला संसर्ग झाल्याचे आञळले. त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात उफचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचा दुसरा स्वॅब चाचणीसाठी घेतला जाणार आहे. तोपर्यंत ते डॅाक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातच मुक्काम करतील. श्री. कुलकर्णी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्या कुटुंबिय तसेच त्यांच्याशी नियमीत संपर्क असणारे सहकारी यांचीही तपासणी करुन घेण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. स्वतः कुलकर्णी यांनी यासंदर्भात विशेष काळजी घेण्याचे आवाहन करीत नागरिकांनी अर्सेनीक अल्बमच्या गोळ्या व काढा याचा वापर करावा असे वारंवार आवाहन केले होते. विविध सार्वजनिक कार्यक्रमांत देखील ते हे आवाहन करीत होते. 

नाशिक शहरात विविध राजकीय नेत्यांना यापुर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झीरवाळ, खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, आमदार सरोज अहिरे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार नरेंद्र दराडे,  जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांसह विविध नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. विशेषतः काही नगरसेवकांनाही कोरोना झाल्याने त्यांनी क्वारंटाईन होऊन उपचार केले होते. 
....
  

https://developers.facebook.com/docs/plugins/embedded-posts/?prefill_hre...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख