थायलंडमध्ये अडकले, पैसेही संपले...मदतीला धावले आदित्य ठाकरे!

येथील विजय काळे थायलंडला गेले अन्‌ "कोविड 19'चे संकट सुरु झाले. त्यामुळे श्री. काळे तेथेच अडकून पडले. नाशिकला परतण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र यश येत नव्हते. आता त्यांच्या सुटकेसाठी युवा सेनेचे नेते, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे मदतीला धावले आहेत.
थायलंडमध्ये अडकले, पैसेही संपले...मदतीला धावले आदित्य ठाकरे!

नाशिक : येथील विजय काळे थायलंडला गेले अन्‌ "कोविड 19'चे संकट सुरु झाले. त्यामुळे श्री. काळे तेथेच अडकून पडले. नाशिकला परतण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र यश येत नव्हते. अद्यापही ते तेथेच अडकले आहेत. केंद्र सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्रस्त झाले होते. मात्र आता त्यांच्या सुटकेसाठी युवा सेनेचे नेते, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे मदतीला धावले आहेत. त्यांनी थेट केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. त्यामुळे त्यांचे मायदेशी परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

https://www.facebook.com/MySarkarnama/posts/1303945789815035

श्री. काळे नाशिकहून १ मार्चला थायलंडला गेले होते. याच सुमारास कोरोनाचा जगभर संसर्ग सुरु झाला. त्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली. त्यात लाखो भारतीय नागरीक भारताबाहेर अडकुन पडले. कोरोनाचा संसर्ग वाढविणाऱ्या देशांच्या यादीत चीनची सीमा नजीक असल्याने, मंगोलियन वंशाचे नागरीक मोठ्या प्रमाणात असल्याने थायलंडचा त्यात समावेष करण्यात आला. त्यात नाशिकच्या श्री. काळे यांच्यासह हजारो नागरीक अडकून पडले होते. सलग अडीच महिने परदेशात अडकल्याने त्यांचे पैसेही संपले. भारतीय वकिलातीशी संपर्क केल्यावर देखील फारसा चांगला प्रतिसाद, मदत काहीच मिळत नव्हता. त्यामुळे केंद्र शासनाच्या वंदे भारत मिशन अंतर्गत विमानसेवा सुरु झाल्यावर देखील त्यांना त्यात स्थान मिळू शखले नाही. आता येत्या २० मेस विमान येणार आहे. त्यात संधी मिळावी यासाठी त्यांनी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे आणि हेमंत गायकवाड यांच्याशी संपर्क केला. त्यांनी त्यांना व्हाटस्‌अप द्वारे पत्र पाठविले. त्यानंतर हालचाली होऊन खासदार गोडसे यांच्यामार्फत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना ही माहिती मिळाली. त्यावर आदित्य ठाकरे यांनी तातडीने प्रतिसाद दत संपर्क केला. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क करुन चर्चा केली. यासंदर्भात त्यांनी पत्र दिले आहे. त्यामुळे श्री. काळे यांना दिलासा मिळाला आहे. आता येत्या २० मेस येणाऱ्या विमानात त्यांना जागा मिळावी यासाठी पाठपुरावा सुरु झाला आहे. त्यामुळे गेले अडीच महिने थायलंडमध्ये अडकलेल्या नाशिकच्या काळे यांना दिलासा मिळाला आहे. 
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com