Nashik Dr Zakir Hussain Hospital Full | Sarkarnama

नाशिक शहरातील डॉ. झाकिर हुसेन कोविड रुग्णालय झाले फुल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

 सध्या कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात 100 पैकी 75 बेड फुल झाले असून, 25 बेड राखीव ठेवले आहेत. त्याव्यतिरिक्त तातडीची व्यवस्था म्हणून महापालिकेने दोन हजार बेडची शहरातील विविध वसतिगृहांत सोय केली आहे. 

नाशिक : दाट लोकवस्तीच्या भागात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसह महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून 69 हजार घरांची तपासणी सुरू झाली आहे. हायरिस्क अर्थात कोरोनाची लक्षणे आढळून येत असलेल्या नागरिकांना पालिकेने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास सुरवात केली असून, आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्रात केलेल्या तपासणीसह 244 रुग्ण तपासणीसाठी दाखल केले आहेत. सध्या कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात 100 पैकी 75 बेड फुल झाले असून,25 बेड राखीव ठेवले आहेत. त्याव्यतिरिक्त तातडीची व्यवस्था म्हणून महापालिकेने दोन हजार बेडची शहरातील विविध वसतिगृहांत सोय केली आहे. 

नाशिकला 6 एप्रिलला गोविंदनगर भागात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यानंतर कमी-अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. सध्या  छपन्न कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तपोवनातील विलगीकरण कक्षात सत्तावीस बेडची व्यवस्था आहे. सध्या तेथे बावीस रुग्ण उपचार घेत आहेत. नाशिक रोड येथील फायर स्टेशन इमारतीत सत्तर बेडची व्यवस्था असून, तेथे बत्तीस जणांवर उपचार सुरू आहेत. विल्होळी येथील कोविड केअर सेंटरमध्ये वीस बेडची व्यवस्था असून, तेथे सद्यःस्थितीत सर्व बेड रिक्त आहेत. कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय कोविड-19 म्हणून घोषित केले आहे. तेथे पंच्च्याहत्तर बेडव्यतिरिक्त पंचवीस बेड राखीव आहेत. सद्यःस्थितीत पंच्च्याहत्तर बेड फुल झाले आहेत. 
खासगी रुग्णालयातही सोय 

शहरातील खासगी रुग्णालयातही कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. अपोलो रुग्णालयात दहा, वोक्‍हार्ट  11, अशोका मेडिकव्हर छत्तीस , सह्याद्री पाच याप्रमाणे कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सर्व रुग्णालयांत प्रत्येकी 100 बेडची व्यवस्था आहे. आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये 700 बेडची व्यवस्था असून, 53 संशयितांवर उपचार सुरू आहेत. 
 
होस्टेलमध्ये दोन हजार बेड राखीव 
शहरातील जैन होस्टेल व माहेश्‍वरी हॉस्टेलमध्ये प्रत्येकी 450, के. के. वाघ होस्टेलमध्ये 800, मविप्रच्या केटीएचएम कॉलेजच्या होस्टेलमध्ये 100, तर आडगाव येथील होस्टेलमध्ये 200 बेडची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिली. 
...
 

https://lm.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fwww.sarkarnama.in%2Ftop-ne...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख