मोठा निर्णय...नाशिकच्या धरणांचे पाणी महाराष्ट्राच्या जमीनीलाच देणार ! - Nashik dam water utilise for maharashtra land Arrigation only | Politics Marathi News - Sarkarnama

मोठा निर्णय...नाशिकच्या धरणांचे पाणी महाराष्ट्राच्या जमीनीलाच देणार !

संपत देवगिरे
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

महाराष्ट्रातील अनेक भाग पाण्यापासून वंचित असल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्याची तहान भागविणे आवश्यक आहे. हे पाणी बाहेर न जावू देता महाराष्ट्राच्याच जमिनीला देणार

नाशिक : गेल्या काही काळात गोदावरी खोऱ्याचे पाणी गुजरातच्या प्रकल्पांना देण्याचे प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु महाराष्ट्रातील अनेक भाग पाण्यापासून वंचित आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्याची तहान भागविणे आवश्यक आहे. त्यामुळे हे पाणी बाहेर न जावू देता महाराष्ट्राच्याच जमिनीला देणार, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात कळमुस्ते प्रवाही वळण योजना, वैतरणा मुकणे वळण योजना उर्ध्व कडवा प्रकल्पांची आढावा बैठक झाली. यावेळी श्री. भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, कळमुस्ते प्रवाही वळण योजना कळमुस्ते शिवारातील डोंगरगाव (त्र्यंबकेश्वर) येथे दमणगंगा खोऱ्यातील वाल नदीच्या स्थानिक नाल्यावर प्रस्तावित आहे. गोदावरी व तापी खोऱ्यातील उपलब्ध पाण्याचा पुर्णपणे वापर झाला असल्याने शासनाने औरंगा, अंबिका, नारपार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा खोऱ्यातील नद्यांचे पाणी अरबी समुद्रात वाहून जात होते. ते गोदावरी व तापी खोऱ्यात वळविण्याचा अभ्यास समन्वय समितीमार्फत करण्यात आला. त्यानुसार 19 प्रवाही वळण योजनेद्वारे 2321 दशलक्ष घनफूट पाणी नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात उपलब्ध होणार आहे. यामध्ये कळमुस्ते ही मोठी वळण योजना आहे. याद्वारे दमणगंगा खोऱ्यातील 690.16 दशलक्ष घनफूट पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचे नियोजन आहे. दुगारवाडीजवळ बांधण्यात येणाऱ्या कळमुस्ते धरणाचे संकल्पचित्र महिन्याभरात पूर्ण करुन शासनाला सादर करण्याची सूचना त्यांनी केली.

वैतरणाचे 1 टीएमसी पाणी वळविणार
वैतरणा धरण पुर्णपणे भरल्यानंतर सांडव्यावरुन वाहून जाणारे पुराचे पाणी वैतरणा नदीत पडते. ते अरबी समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे उर्ध्व वैतरणा-मुकणे धरण प्रवाही वळण योजनेतंर्गत उर्ध्व वैतरणा धरणाच्या सॅडल डॅमद्वारे 1 टीएमसी पाणी मुकणे धरणात  वळविण्यातविषयी बैठकित चर्चा झाली. वैतरणा धरणासाठी अतिरिक्त संपादित जमिनीबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अमंलबजावणी करण्यात येईल. 
...

https://scontent.fdel1-3.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख