नाशिक शहरासह जिल्ह्यात घटतेय कोरोनाग्रस्तांची संख्या!

नाशिक शहरासह जिल्ह्यातही माझे कुटुंब, माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत घरोघरी जाऊन तपासणी सुरु आहे. नागरिकांत जनजागृती सुरु आहे. त्याचा परिणाम म्हणजे रोजच्या रुग्णसंख्येत जिल्ह्यात १२३ तर शहरात रोजच्या रुग्णांची संख्या निम्म्यावर आली आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात घटतेय कोरोनाग्रस्तांची संख्या!

 नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यातही माझे कुटुंब, माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत घरोघरी जाऊन तपासणी सुरु आहे. नागरिकांत जनजागृती सुरु आहे. त्याचा परिणाम म्हणजे रोजच्या रुग्णसंख्येत जिल्ह्यात १२३ तर शहरात रोजच्या रुग्णांची संख्या निम्म्यावर आली आहे. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. 

 नाशिक शहरात काल दिवसभरात दोन हजार ६३० रुग्णांची तपासणी झाली. या तपासणीत ५८९ पॅाझिटिव्ह रुग्ण आढळले. शहरात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर क्वारंटाईन सेंटर्सवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रात सध्या एक हजार २५७ पथके तपासणी करीत आहेत. शहरात ३.९९ लाख हाय रिस्क नागरिक आढळले आहेत. त्यात सर्वाधीक संख्या पंचवटीत नऊ हजार ५६८ आहे. सातपूरला पाच हजार १३३, नाशिक रोड विभागात सात हजार ६२८, नाशिक पश्चिम विभागात चार हजार १५८, नाशिक पूर्व सहा हजार १८९ तसेच सिडको विभागात सात हजार ७०९ हायरिस्क नागरिक आहेत. त्याबाबत वैद्यकीय विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांत देखील चांगला संदेश गेला आहे. मात्र मास्कचा वापर आणि सॅनीटायझेशन अन्य सुरक्षांविषयी असलेली उदासीनता अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.   

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील एकाहत्तर  हजार २५५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत नऊ हजार १७७  रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये १२३  ने घट झाली आहे.  आत्तापर्यंत एक हजार ४६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

९,१७७ पॉझिटिव्ह रुग्ण
नाशिक जिल्ह्यात तालुकानिहाय रुग्णांची संख्या अशी, नाशिक ६०३, चांदवड १७१ , सिन्नर ७४७, दिंडोरी २३९, निफाड ७३५, देवळा १२४,  नांदगांव ५११, येवला ८०, त्र्यंबकेश्वर १६०, सुरगाणा ३८, पेठ ३५, कळवण १४४, बागलाण २३६, इगतपुरी २१३, मालेगांव ग्रामीण ३१८ असे चार हजार ३५४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात चार हजार २८५, मालेगांव महापालिका क्षेत्रात ४१०  तर जिल्ह्याबाहेरील १२८ असे एकूण नऊ हजार १७७  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  आजपर्यंत जिल्ह्यात  ७१ हजार २५५  रुग्ण आढळून आले आहेत.

बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिकच्या ग्रामीण भागात ७८.३४,  टक्के, नाशिक शहरात ९०.८० टक्के, मालेगावमध्ये ८५.३७  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७१.८६  टक्के आहे. जिल्ह्यात बरे होण्याचे सरासरी प्रमाण ८७.०१ इतके आहे. नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात ४९१, नाशिक महापालिका क्षेत्रात  ७८३, मालेगांव महापालिका क्षेत्रात १५८  व जिल्हा बाहेरील ३१ अशा एक हजार ४६३  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 
....
 

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=MpNSTcwoGU8AX9q12ON&_nc_ht=scontent.fpnq6-1.fna&oh=0d3a7b825b0cea872a58775741fa01f7&oe=5FA3AD27

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com