राज्यात नाशिकमध्ये  `कोरोना`चा मृत्युदर सर्वात कमी - Nashik covid-19 death rate is lowest in the state | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यात नाशिकमध्ये  `कोरोना`चा मृत्युदर सर्वात कमी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 27 सप्टेंबर 2020

जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या तीन हजारांनी कमी झाली आहे. `कोरोना`चा मृत्यदर १.६ टक्के असा राज्यात सर्वात कमी आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे मापदंड एकास दहा असताना, नाशिक जिल्ह्याचा एकास तीस एव्हढे आहे.

नाशिक : जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या तीन हजारांनी कमी झाली आहे. `कोरोना`चा मृत्यदर १.६ टक्के असा राज्यात सर्वात कमी आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे मापदंड एकास दहा असताना, नाशिक जिल्ह्याचा एकास तीस एव्हढे आहे, त्यामुळे कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासह उपचारामध्ये चांगले लक्ष्य गाठण्यात यश आले आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.   

ते म्हणाले, स्वॅब तपासणीतही नाशिक ची कामगिरी अत्यंत वेगवान आहे.  औषधे. इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारी आणि महापालिकेच्या रूग्णालयांमध्येच जास्तितजास्त साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे, त्यांच्यामार्फत औषधसाठ्याची, किमतीची नियमित तपासणी करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात २४ ते २८ टन ऑक्सिजनची गरज आहे. जिल्ह्यातील स्थानिक उद्योगांच्या सहकार्यातून दररोज ५५ टन निर्मिती केली जात आहे, त्यामुळे आजच्या स्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा नाही. तो पुरेसा उपलब्ध आहे.

ते म्हणाले, नाशिक शहरात ठक्कर डोमच्या माध्यमातून आदर्श कोविड सेंटरची संकल्पना तर राबवली जाते आहे. याशिवाय पोलीस आयुक्त दीपक पांडेंच्या संकल्पनेतून पोलीस आणि त्यांच्या कुटुबियांसाठी शंभर बेडचे ऑक्सिजनची सुविधा असलेले स्वतंत्र कोविड सेंटर निर्माण करण्यात आले आहे. या दोन्ही कोविड सेंटरमध्ये रूग्ण उपचार घेत आहेत. 

भुजबळ यांनी शहरातील विविध सुविधांची माहिती दिली. ते म्हणाले, नाशिक महापालिकेकडून रुग्णांसाठी पुरेसे बेड उपलब्ध आहेत. भविष्यात देखील बेड कमी पडणार नाही. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन सेंटरची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात २५ ते ३० ऑक्सिजन बेड  उपलब्ध करून दिले आहेत. आसर्व प्रशासन आपली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडत आहेत. 

यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,  जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दीघावकर, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, लीना बनसोड आदी या बैठकीस उपस्थित होते. 
...
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_4607380974576...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख