नाशिकमध्ये होणार १९ लाख नागरिकांची `करोना` तपासणी 

महानगरपालिकेतर्फे `माझे कुटुंब माझी जबाबदारी` मोहिमेची सुरुवात शहरातील सर्व विभागांमध्ये एकाच वेळी करण्यात आली आहे. या माध्यमातून कोविड मुक्त नाशिक करण्यासाठी ८०० पथके शहरातील सर्व घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करतीलल.
नाशिकमध्ये होणार १९ लाख नागरिकांची `करोना` तपासणी 

नाशिक : महानगरपालिकेतर्फे `माझे कुटुंब माझी जबाबदारी` मोहिमेची सुरुवात शहरातील सर्व विभागांमध्ये एकाच वेळी करण्यात आली आहे. या  माध्यमातून कोविड मुक्त नाशिक करण्यासाठी ८०० पथके शहरातील सर्व घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करतीलल. यामध्ये साडेचार लाख घरांतील १९ लाख नागरिकांची तपासणी केली जाईल, असे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

ते म्हणाले, शासनाच्या निर्देशानुसार शहरातील कोविड-१९ नियंत्रण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी कोविड मुक्त महाराष्ट्र’ ही मोहीम राबवण्याचे आदेश आहेत. १५ सप्टेंबर पासून दोन टप्प्यात ही मोहीम होईल.  यामध्ये मधुमेह, ह्रदयरोग, कर्करोग, किडनी विकर, अवयव प्रत्यारोपण, दमा आदी आजाराबाबत माहिती घेतली जाणार आहे. 

या मोहीमेसाठी ७९४ पथके नियुक्त केले आहेत. त्यात विभागनिहाय पथकांमध्ये नाशिक पूर्व १५२ पथके व ८३,६०१ घरे आणि ३,६१,०६६ नागरिक, नाशिक पश्चिम विभागात १०५ पथके ५१,३१२ घरांमधील २,३२,४९९ नागरिक, पंचवटी विभागात ९९ पथके ५६,७४९ घरांमधील २,६४,२५६ नागरिक, नाशिकरोडला १४३ पथके ६०,७४३ घरांमधील ३,१०,७४० नागरिक, सिडको विभागात १५४ पथके १,०५,८५० घरांमधील ४,२४,७७० नागरिक, सातपूर विभागात १४१ पथके ८२,३०३ घरांमधील ३,०८,३६२ नागरिकांची अशी शहरातील ४,४०,५५८ घरातील १९,०१,६९३ नागरिकांची ७९४ पथकाच्या माध्यमातून तपासणी होईल.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा,सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळावेत व सँनीटायझरचा वापर करावा त्रिसूत्रीचा वापर करावा.घरी असल्यावर साबणाने हात धुवावेत या नियमांचे काटेकोर पालन करावे जेणे करून आपण कोरोना मुक्त नाशिक करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास मा.आयुक्त श्री.कैलास जाधव यांनी व्यक्त केला आहे.
...
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=IJjfSVQdRK0AX9iJte7&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=51025ed308444a97a958cda27edc4e55&oe=5F8FE6A7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com