विधानसभेत चर्चा झालेल्या नाशिकला रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के - nashik city corona recovery percent goes on 80.04 percent | Politics Marathi News - Sarkarnama

विधानसभेत चर्चा झालेल्या नाशिकला रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३७ हजार ७७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत ८ हजार २७५ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ९७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३७ हजार ७७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत ८ हजार २७५ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ९७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

पावसाळी अधिवेशनात विधानसभेत कोरोनावर चर्चा करतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष उल्लेख केलेल्या नाशिक शहरातील कोरोना रुग्णांचे प्रमाण अन्य शहरांच्या तुलनेत सुधारत आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.०४ टक्के आहे. शहरातील सर्व खाजगी तसेच शासकीय रुग्णालयांतील उपचाराच्या सुविधांवर आणि उपचारावर विशेष लक्ष दिले जात आहे. स्थानिक पातळीवर विविध तक्रारी प्राप्त झाल्याने गेल्या काही दिवसांत वरिष्ठांनी त्यात विशेष लक्ष घातले आहे.   

शहरात रोज एक हजाराहून अधिक नवीन कोरोना रुग्ण दाखल होत आहेत. मंगळवारी नाशिक शहरात एक हजार ४८६ कोरोना पॅाझिटिव्ह रुग्ण आढळले. ही संख्या राज्यातील अन्य कोरोना हॅाटस्पॅाट असलेल्या शहरांच्या तुलनेत जवळपास असल्याने तो एक प्रकारे धोक्याचा इशारा आहे. यापूर्वी २९ तारखेला कोरोना बाधीतांची संख्या एक हजार २७४ होती.  

नाशिक जिल्ह्यात विविध तालुक्यांतील कोरोना रुग्णांची संख्या अशी, नाशिक ४१०, चांदवड १०७, सिन्नर ४१५, दिंडोरी ८७, निफाड ५९७, देवळा ७५,  नांदगांव ३३६, येवला ९९, त्र्यंबकेश्वर ५४, सुरगाणा ०२, पेठ १०, कळवण २५,  बागलाण २८१, इगतपुरी ९०, मालेगांव ग्रामीण ३२७ असे एकूण २ हजार ९१५  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार ७१७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६२८  तर जिल्ह्याबाहेरील १५ असे एकूण ८ हजार २७५  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ४६  हजार ३२५  रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७१.४९,  टक्के, नाशिक शहरात ८३.५१ टक्के, मालेगाव मध्ये  ७४.६२  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.१५  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ८०.०४ इतके आहे. नाशिक जिल्ह्यात २८२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ५४८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ११९  व जिल्हा बाहेरील २४ अशा एकूण ९७३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

...

https://scontent.fpnq6-1.fna.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_46073809745...

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख