छगन भुजबळ म्हणाले, "नाशिकचा बोट क्‍लब 1 नंबर होईल' 

नाशिकच्या पर्यटन केंद्राचे ऑनलाईन उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. गंगापूर धरणावरील या पर्यटन केंद्रात बोट क्‍लब निर्माण करण्यात आला आहे. त्यासाठी कॅनडातून प्रदूषण विरहीत बोटी आणल्या आहेत.हा राज्यातला एक नंबरचा बोट क्‍लब असणार आहे,
छगन भुजबळ म्हणाले, "नाशिकचा बोट क्‍लब 1 नंबर होईल' 

नाशिक : नाशिकच्या पर्यटन केंद्राचे ऑनलाईन उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. गंगापूर धरणावरील या पर्यटन केंद्रात बोट क्‍लब निर्माण करण्यात आला आहे. त्यासाठी कॅनडातून प्रदूषण विरहीत बोटी आणल्या आहेत. त्यातील काही बोटी या मागच्या सरकारच्या काळात स्थलांतरीत झाल्या. आता उर्वरीत बोटीसह येथे पर्यटन केंद्र कार्यन्वीत झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात लवकरच हा बोट क्‍लबचा प्रकल्प सुरु केला जाईल. हा राज्यातला एक नंबरचा बोट क्‍लब असणार आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले 

श्री. भुजबळ म्हणाले, येथील क्‍लबसाठी कॅनडाहून 50 बोटी आणल्या होत्या. मागच्या सरकारच्या काळात त्यातील काही इतरत्र देण्यात आल्या. उर्वरीत बोटी लोकांनी सुरक्षित ठेवल्या होत्या. त्यांची तपासणी करून त्या उपयोगात आणल्या जातील. नव्याने काही बोटींची आवश्‍यकता असेल, तर त्या आणल्या जातील. त्यासाठी अनुभवी लोकांची मदत घेतली जाईल राज्य शासनाच्या वतीने येथे साहसी क्रीडा केंद्र, कन्व्हेन्शन सेंटरसह कलाग्राम सुरु करु. अंजनेरी येथील ट्रेकिंग इन्स्टिट्यूट देखील लवकरच सुरु करण्यात येईल. या माध्यमातून नाशिकच्या अर्थकारणात मोठी गती मिळणार आहे. या मेगा पर्यटन संकुलात समाविष्ट असलेल्या बोट क्‍लबच्या डिझाईनचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला. तसेच परदेशातून नामवंत मासिकांनी याची दखल घेऊन आपल्या फ्रंट पेजवर त्याची दखल घेतली. 

ते म्हणाले, यापुढील काळात नाशिक शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेले इगतपुरी येथे हिल स्टेशन विकसित करणे, दादासाहेब फाळके चित्रपट नगरीचा विकास, श्री संत निवृत्ती देवस्थान विकास आराखडा, श्री सप्तशृंगी गड विकास आराखडा, भावली धरण येथील पर्यटन विकास, ओझरखेड धरण येथील पर्यटन विकास, नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य, येवला तालुक्‍यातील ममदापूर येथील वन पर्यटन क्षेत्राचा विकास करून पर्यटनाला अधिक चालना देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या वतीने करण्यात येईल. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने ही कामे तातडीने हाती घेण्यात यावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे. भविष्यात जास्तीत जास्त पर्यटक महाराष्ट्रात खेचून आणण्याचे प्रयत्न करण्यात येतील. 

"ग्रेप पार्क रिसॉर्ट' च्या पहिल्या टप्प्यात कक्ष तसेच उपहारगृह, सभागृह, जलतरण तलाव, सायकल ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, आयुर्वेदिक स्पा व मसाज केंद्र, वाईन टेस्टिंग केंद्र, द्राक्ष महोत्सवाकरिता पायाभूत सुविधा पर्यटकांना उपलब्ध होतील. येथे अद्यावत स्वरुपात अंतर्गत सजावट, विद्युतीकरण, पाणीपुरवठा, अग्निशामक यंत्रणा व बाह्यपरिसर सुशोभिकरण करण्यात आले आहे. द्राक्ष पर्यटनासह नाशिक वाईन व वायनरीला पर्यटकांमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी सदर "ग्रेप पार्क रिसॉर्ट' अर्थात लेक व्ह्यू नेचर्स रिसॉर्ट चा उपयोग होणार आहे. शहर व जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी हे मेगा पर्यटन संकुल अत्यंत महत्वपूर्ण ठरेल. 
... 
 

https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t39.2365-6/12726927_460738097457654_855104592_n.png?_nc_cat=103&_nc_sid=ad8a9d&_nc_ohc=L7Bqo_Br3akAX9SkCWm&_nc_ht=scontent-sin6-2.xx&oh=728c2ec1929f72bdfd07eccae4909877&oe=5F97CFA7

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com